नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : उच्च रक्तादाब म्हणजेच ब्लड प्रेशर हा घराघरात पोहचलेला आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार देशभरात 1.28 अब्ज लोकांना ब्लड प्रेशरचा आजार आहे. हा आजार असणाऱ्या लोकांना रोज गोळी घ्यावी लागते. त्यानंतरच त्यांचा ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. परंतु आता ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. हा आजार असणाऱ्यांना रोज गोळी घेण्यापासून सुटका मिळणार आहे. वैज्ञानिकांनी एक इंजेक्शन शोधून काढले आहे. हे इंजेक्शन एक वेळेस घेतले म्हणजे सहा महिने ब्लड प्रेशरपासून सुटका मिळणार आहे. म्हणजे एकदा इंजेक्शन घेतल्यानंतर सहा महिने ते नॉर्मल राहणार आहे.
ब्लड प्रेशरचे हे इंजेक्शन दर सहा महिन्यांतून एकदा घ्यावे लागणार आहे. या इंजेक्शनचे नाव जिलेबेसिरन (zilebesiran) आहे. या इंजेक्शनमधील औषध लिव्हरमध्ये केमिकल एंजियोटेंसिनचे (angiotensin) उत्पादन करतो. एंजियोटेंसिन या केमिकलमुळे रक्तवाहिन्या संकुचित होत नाही. यामुळे ब्लड प्रेशर सामान्य राहते.
जिलेबेसिरन इंजेक्शनसंदर्भात माहिती अमेरिकन हार्ट असोसिएशन सायंटीफीक सेशन २०२३ मध्ये देण्यात आली. त्यात दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅड प्रेशरचे औषध विसरणाऱ्यांसाठी एक इंजेक्शन काम करणार आहे. ब्लॅड प्रेशरची गोळी घेणे विसल्यास त्याचा परिणाम ह्रदयावर होतो. यासंदर्भात बोलताना प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. चेंग हान चेन हे इंजेक्शन म्हणजे रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
जिलबेसिरन इंजेक्शनचा प्रभाव तपासण्यासाठी 394 जणांवर चाचणी करण्यात आली. या लोकांचा ब्लड प्रेशर 135 ते 160 दरम्यान राहत होतो. या लोकांना 6 महिन्यात 150 एमजी ते 600 एमजीपर्यंत इंजेक्शन दिले गेले. या सर्वांचा ब्लड प्रेशर त्यानंतर नॉर्मल होता. स्टेनफोर्ड मेडिसीन हायपरटेंशन सेंटरचे संचालक डॉ. विवेक भल्ला यांनी म्हटले की, हे इंजेक्शन 6 महिन्यांपर्यंत काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. रुग्णाच्या प्रकृतीनुसार 3 ते 6 महिन्यांतून हे इंजेक्शन द्यावे लागणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे इंजेक्शन बाजारात येणार आहे.