नवी दिल्ली: दिवसभर फोन किंवा लॅपटॉपवर चिपकून राहणं तुमच्यासाठी महागात पडू शकतं. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभर लॅपटॉप किंवा फोनवर राहिल्यास तुमच्या हातांच्या मांसपेशांमध्ये तनाव येतो, डोळे शुष्क होऊ लागतात, मानदुखी वाढते आणि वजन वाढू शकतं. तसेच कोणताही ब्रेक न घेता या गॅझेटवर राहिल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. मूड स्विंग आणि चिडचिडेपणाची समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय तुम्हाला अकाली म्हातारपणही येऊ शकतं. (blue light from laptop screens is making you look older know how)
या सर्व साईड इफेक्ट्ससह दिवसभर ब्लू लाईटही तुमच्या त्वचेला मारक ठरते. सतत मोबाईल आणि लॅपटॉपवर राहिल्यास तुम्ही थकल्यासारखे आणि वयस्क दिसू लागता. काही अभ्यासातून या गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यामुळेच डिजिटल टेक्निकवरील निर्भर राहिल्याने त्याचा आरोग्य आणि त्वचेवर काय परिणाम होतो, याचा घेतलेला हा आढावा.
लॅपटॉपवर दिवसभर बसून काम करणं इतकं वाईट नसतं. पण लॅपटॉपची ब्लू लाईट सर्वात घातक असते. एचव्ही म्हणजेच ब्लू लाईट ही तुमच्या त्वचेच्या कोशिकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे त्वचेच्या कोशिकांना नुकसान पोहोचू शकते. एचईव्ही लाईट व्हिजिबल स्पेक्ट्रम ही व्हायलेट ब्लू बँडमध्ये हाय फ्रिक्वेन्सी आणि लाईटची छोटी व्हेवलेंथ आहे.
निळा प्रकाश सूर्याची किरणे, ट्यूबलाईमधून येणारा प्रकाश, एलईडी आणि टीव्ही स्क्रीन, स्मार्टफोन, टॅबलेट आणि कंप्युटरसहीत सर्व प्रकारचे गॅझेट असतात.
तुमचा लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रिनने स्किन सेल्स डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो. कारण हा प्रकाश थेट चेहऱ्यावर येतो. पूर्वी लोक अल्ट्राव्हायलेट रेजला घाबरायचे कारण. त्यामुळे कॅन्सर होतो अशी त्यांच्या मनात भीती होती. मात्र, लॅपटॉपमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे त्वचेला नुकसान होत असल्यांच संशोधनातून पुढे आलं आहे.
गॅझेटमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोप उडत असून त्याचा डोळ्यावर परिणाम होत असल्याचं काही वर्षापूर्वी लोकांना वाटत होतं. मात्र, त्वचेवरील त्याच्या होणाऱ्या परिणामाची नुकतीच माहिती समोर आली आहे. सूर्य किरणातील अल्ट्राव्हायलेट रेज थेट सेल डिएनएला मारक ठरतात. तर निळा प्रकाश ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करून कोलेजन नष्ट करतो. त्यामुळे चेहऱ्यावर रिंकल्स, फाईन लाईन्स, डार्क सर्कल बनतात आणि अकाली म्हातारपण आल्याचं दिसून येतं.
गॅजेटमधून येणाऱ्या या निळ्या प्रकाशामुळे हायपरटेंन्शनचा त्रास होऊ शकतो. अधिक काळ या निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्यास त्वचेचा रंगही हळूहळू बदलून जातो. मध्यम गहूवर्णीय रंगाच्या लोकांमध्ये ही समस्या सामान्यपणे दिसून येते. तर व्हाईट स्किन टोन असलेल्यांमध्ये त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचं दिसून येतं.
>> निळ्या प्रकाशामुळे त्वचेला हानी पोहोचू द्यायची नसेल तर त्यातील निळा प्रकाश सीमित ठेवा.
>> लॅपटॉप स्क्रिनसाठी एक ब्लू लाईट स्क्रीन खरेदी करा. त्यामुळे त्वचेला होणारं नुकसान कमी होईल.
>> एलईडी बल्बचा वापर करा. त्यातून निळ्या प्रकाशाचं कमी प्रमाणात उत्सर्जन होतं.
>> तुमच्या स्क्रिन टाईमला सीमित करा
>> लॅपटॉपवर काम करत असाल तर मध्येमध्ये ब्रेक घ्या
>> स्किन डॅमेज होण्यापासून वाचवायची असेल तर आयरन ऑक्साईडसह मिनरल सन स्क्रिन लावा. त्यामुळे निळा प्रकाश तुमच्या त्वचेपर्यंत येत नाही. (blue light from laptop screens is making you look older know how)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 14 September 2021 https://t.co/ExxXBsoVvX #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2021
संबंधित बातम्या:
अनियमित मासिक पाळीच्या समस्येनं त्रस्त असाल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा
चीनच्या फुजियान प्रांतात डेल्टा वेरिएंटचा कहर, संपूर्ण शहर सील, चित्रपटगृह, शाळा, हायवे सगळं बंद
(blue light from laptop screens is making you look older know how)