तरुण वयातच हाडे कमकुवत? या सवयींमुळे Calcium ची होतेय कमी, आजच लक्ष द्या!

| Updated on: Aug 18, 2023 | 4:18 PM

तरुण वयातच आजकाल हाडे कमकुवत होण्याची समस्या दिसून येते. या समस्येला सामोरं कसं जायचं हे बरेचदा कळत नाही. हाडे कमकुवत होण्याची अनेक लक्षणं आधीपासूनच दिसून येतात. सध्याच्या युगात असणारी धावपळ याला कारणीभूत आहे. पण मग नेमकी कारणं काय आहेत कशामुळे हाडे कमकुवत होतात? काय खाल्ल्याने हे होतं? मग हाडे कशी मजबूत होतात? चला बघुयात...

तरुण वयातच हाडे कमकुवत? या सवयींमुळे Calcium ची होतेय कमी, आजच लक्ष द्या!
bone health
Follow us on

मुंबई: जर आपल्याला आपले शरीर मजबूत ठेवायचे असेल तर हाडे मजबूत करणे आवश्यक आहे, परंतु वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होऊ लागतात कारण वयाच्या 35 ते 40 नंतर शरीरात कॅल्शियम कमी होऊ लागते. ज्याचा परिणाम हाडे आणि दातांवर दिसू लागतो. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात कॅल्शियम व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी ची सुद्धा गरज असते. व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असेल तरच अंगदुखी आणि हाडांचे बिघाड टाळता येतात. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे हाड कमकुवत होतात.

या सवयींमुळे हाडे कमकुवत होतात

1. जे लोक बरेचदा जास्त लाल मांस खातात त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त प्रथिने मिळू लागतात, ज्यामुळे ॲसिडिटीची समस्या उद्भवते हे कॅल्शियम शौचालय दरम्यान शरीराबाहेर पडते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात प्रथिनेयुक्त आहार घ्या.

2. जे लोक कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स सारख्या कार्बोनेटेड पेयांचे जास्त सेवन करतात त्यांना हाडांच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशा पेयांमध्ये अधिक फॉस्फेट असते जे कॅल्शियम कमी करण्यास जबाबदार असते, अशा वेळी हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

3. काही लोक ॲसिडिटीच्या औषधांचे जास्त सेवन करतात, त्यांनी त्याला आळा घालावा. या औषधांमुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक सारख्या खनिजांच्या शोषणात अडचणी येतात.

4. हाडे मजबूत ठेवायची असतील तर चहा-कॉफीचे सेवन कमी करा, कारण त्यात असलेल्या कॅफिनचा हाडांवर परिणाम होतो.

हाडे मजबूत करण्याचे मार्ग

1. काजू, बदाम, मनुका आणि अक्रोड सारख्या ड्रायफ्रूट्सचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करा कारण त्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

2. जर तुम्हाला साखर खायला आवडत असेल तर आजपासूनच साखरे ऐवजी गूळ खाण्यास सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या शरीराला कॅल्शियम आणि लोह दोन्ही मिळतील.

3. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जर तुम्ही खात नसाल तर आतापासूनच त्याचे सेवन सुरू करा, दुधाव्यतिरिक्त दही आणि चीज खाण्याचा फायदा होतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)