जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागात रक्ताभिसरण योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा स्ट्रोक होतो. याची सुरुवातीची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अशातच लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मते, स्ट्रोक हे सयुंक्त राज्य असलेल्या अमेरिकेत मृत्यूचे प्रमुख कारण बनलेलं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास मेंदूच्या पेशी आणि ऊती खराब होतात. स्ट्रोकची लक्षणे ओळखणे आणि लवकर निदान आणि उपचार घेणे महत्वाचे आहे.
मेंदूमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे ऊती आणि पेशींचे नुकसान होते. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांचेही नुकसान होते. स्ट्रोकने ग्रस्त असणाऱ्या लोकांना जितक्या लवकर उपचार मिळेल तितके चांगले परिणाम होतील. या कारणास्तव, स्ट्रोकची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे.
आजकालची चुकीची जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे अनेकांना अनेक न्यूरोलॉजिकल आजारांना सामोरे जावे लागत आहे. जसे मायग्रेन, स्ट्रोक असे अनेक प्रकारचे नॉन कॅन्सर ब्रेन ट्यूमर, जे आजच्या काळात खूप साधारण झाले आहे. दरवर्षी ४० ते ५० हजार लोक ब्रेन ट्यूमरचे बळी ठरतात. ब्रेन स्ट्रोकचा धोका आधीच २५ टक्क्यांनी वाढला आहे
भारतातील तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये गेल्या ५ वर्षांत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. बहुतेक प्रकरणे २५ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आढळतात. खरं तर यामागचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, खाणं, वाईट सवयी, धुम्रपान आणि योग्य आहार घेण्याची काळजी न घेणं, ज्यामुळे हाय बीपी आणि मधुमेह असे अनेक आजार होतात.
केवळ ब्रेन स्ट्रोकच नाही तर शुगर आणि हाय बीपीकडेही लक्ष वेधते. याशिवाय अनुवांशिक आजारांचा धोकाही वाढत आहे. झोपेचे विकार, हृदयाशी संबंधित आजार, हाय बीपी, ताणतणाव यामुळे आजकाल लोकांना अनेक आजार होत आहेत. या सर्वांव्यतिरिक्त वायू प्रदूषण हाही एक घटक आजारासाठी कारक बनत चालेला आहे.
भारतात दरवर्षी १ लाख ८५ हजारांहून अधिक रुग्ण आढळतात. ज्यामध्ये दर ४० सेकंदाला ब्रेन स्ट्रोकचे प्रकरण समोर येते. त्याचबरोबर दर मिनिटाला ब्रेन स्ट्रोकने मृत्यू होत आहे, खरं तर ब्रेन स्ट्रोक डोक्याला मार लागल्याने सुद्धा होत असतो. त्यामुळे डोक्याला होणारी इजा टाळावी लागते. आहाराची विशेष काळजी महत्वाची आहे. धूम्रपान आणि तणावापासून दूर राहा. नियमित व्यायाम करत राहा. व्यायाम, फिरायला जाणे, मधुमेह, लठ्ठपणा, हाय बीपी, डिस्लिपिडेमिया सारखे आजार टाळता येतील. स्वत:ची काळजी घेतली तर न्यूरोलॉजिकल आजार टाळता येतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)