हसल्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्य वाढते. काही लोक हसल्यानंतर त्यांचे दात हे मोत्या सारखे चमकतात. परंतु काही लोक असे देखील आहेत की जे हसल्यानंतर त्यांचे पिवळे दात दिसतात. अशा लोकांना काही वेळा लाजिरवाणे वाटते. काही जण तोंडाच्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतात. मात्र एवढे करून देखील त्यांचे दात पिवळेच राहतात आणि कधीच पांढरे होत नाहीत. अशावेळी तुमचीही अशीच तक्रार असेल तर जाणून घेऊया काही टिप्स ज्याने तुमचे दात मोत्यासारखे चमकू लागतील.
जर तुमचे दात पिवळे झाले असतील तर दात घासताना काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ब्रश आणि टूथपेस्टची योग्य निवड करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही टूथपेस्ट निवडता तेव्हा त्यात फ्लोराईड आहे की नाही हे विशेषतः तपासा. फ्लोराईड असलेले टूथपेस्ट दात मजबूत करण्यास मदत करते आणि दातामध्ये निर्माण होणाऱ्या पोकळी पासून संरक्षण करते. तसेच ब्रश नेहमी मऊ पाहिजे.
दात घासताना ब्रश नेहमी 45 अंशाच्या कोनात ठेवा. त्यामुळे दात आणि हिरड्या यांची चांगली स्वच्छता होईल. नेहमी हलक्या हाताने आणि गोलाकार पद्धतीने ब्रश करा. दात स्वच्छ करताना तोंडातील प्रत्येक भागाला स्वच्छ करायला योग्य तो वेळ द्या. त्यामुळे तुमचे दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ होतील.
दिवसातून किती वेळा दात घासावे हा एक अतिशय साधा आणि अनेकदा विचारला जाणारा प्रश्न आहे. खरं तर अनेक लोक सकाळी उठल्यानंतर लगेच दात स्वच्छ करतात. पण दिवसातून किमान दोन वेळा दात घासणे आवश्यक आहे. तुम्ही सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणे आवश्यक आहे.
दात स्वच्छ केल्यानंतर जीभ साफ करणे गरजेचे आहे असे ठरवा. जीभ स्वच्छ करण्यास साठी तुम्ही टंग क्लीनर किंवा ब्रशचा देखील वापर करू शकता. जिभेची स्वच्छता केल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि दाताची चमक वाढते.