नवी दिल्ली – देशात मंकीपॉक्सचे (Monkey Pox)रुग्ण सापडून आता आठवडा उलटला आहे. पहिले तिन्ही रुग्ण हे करळात (Kerala)सापडले आहेत. पहिला रुग्ण कोल्लमचा रहिवासी आहे,त्याचे वय 35 आहे आणि 12 जुलैला हा रुग्ण दुबई प्रवासावरुन परतला होता. दुसरा रुग्ण कन्नूरचा रहिवासी आहे. हाही रुग्ण 13 जुलैला दुबईहून परतला होता. तिसरा रुग्ण हा मल्लपूरमचा रहिवासी आहे, हा रुग्ण 6 जुलैला अरब अमिरातमधून परतला होता. चौथा रुग्ण दिल्लीत (Delhi)सापडला आहे. या रुग्णाने परदेशी प्रवास केला नव्हता. मनालीत एका पार्टीत सामील होऊन काही दिवसांपूर्वीच तो दिल्लीत परतला होता. या चारही प्रकरणात संक्रमित रुग्ण हे पुरुष आहेत आणि त्यांचे वय 35 च्या आसपास आहे. परदेशात न जाताही मंकीपॉक्स झालेला रुग्ण सापडल्याने दिल्लीतील नागरिकांत भीती पसरली आहे. अशा स्थितीत हा आजार नेमका काय आहे, समलैंगिक संबंधातून हा आजार होऊ शकतो का, कशामुळे हा आजार पसरतो, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न
या आजाराची लागण मंकीपॉक्स नावाच्या वायरसमुळे होते. आर्थोपोक्स व्हायरस समुहातील हा मंकीपॉक्स व्हायरस आहे. या आजारात शरिरावर कांजण्यासारख्या पुळ्या उठतात. या पुळ्या ज्या वैरियोला व्हायरसमुळे होतात तो या समुहाचा भाग आहे. मंकीपॉक्सची लक्षणे कांजण्यांसारखी गंभीर नाहीत. अत्यंत कमी प्रकरणात मंकीपॉक्सचा आजार हा जीवघेणा ठरु शकतो. या आजाराचा कांजण्यांशी काहीही संबंध नाही.
हा संक्रमित आजार असला तरी याचा प्रसार प्रामुख्याने तीन प्रकारांनी होतो.
त्वचेचा त्वचेशी संबंध आल्याने– म्हणजेच एखाद्या व्यक्तीने संक्रमित व्यक्तीला स्पर्श केल्यास मंकीपॉक्स होऊ शकतो.
शरिरातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्गामुळे– संक्रमित व्यक्तीच्या शरिरातील थुंकी, शिंक, घाम यामुळे हा आजार संक्रमित होतो.
पुरळाशी संपर्क आल्यास– या आजारातील व्यक्तीच्या अंगावर असलेल्या पुरळांच्या संपर्कात आल्यास हा रोग होऊ शकतो.
रक्तानी किंवा वीर्याने या आजाराचा संपर्क होतो का, यावर तज्ज्ञांनी असे पुरावे मिळाले नसल्याचे सांगितले आहे. मात्र संक्रमित व्यक्तीच्या उत्सर्गातून हा आजार होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
न्यू इंग्लंड जर्मन ऑफ मेडिसिनच्या एका रिपोर्टनुसार, मंकीरॉक्सचे संक्रमण झालेले 98 टक्के रुग्ण हे समलैंगिक पुरुष किंना उभयलिंगी पुरुष आहेत. त्यामुळे हा गुप्तरोग आहे का, असा प्रश्न आता विचारण्यात येतो आहे. याबाबत एका तज्ज्ञाने सांगितले की, पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या दुसऱ्या पुरुषांत मंकीपॉक्स झाल्याची प्रकरणे जास्त आहेत. मात्र या आजाराविरोधातील लढाईत लोकांनी संवदेशनशील आणि भेदभावमुक्त राहण्याची गरज आहे. दुसऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, मंकीपॉक्सचे रुग्ण पुरुष अधिक असले तरी, संबंधांतून हे संक्रमण असे त्याला म्हणता येणार नाही. हा गुप्तरोग आहे का, याबाबत संशोधन सुरु आहे. लैगिंक संबंधात ेकमेकांशी संपर्कात आल्यानेहीहा आजार होऊ शकतो.
मंकीपॉक्स हा कोरोनापेक्षाकमी धोकादायक असल्याचे मानण्यात येते. मंकीपॉक्समध्ये असलेला व्हायरस हा कोरोनापेक्षा स्थिर असल्याने, याच्या प्रसाराची गती कमी आहे. दुसरे म्हणजे कोरोनाचा व्हायरस लक्षणे नसतानाही संक्रमित होऊ शकतो.य मंकीपॉक्समध्ये लक्षणे समोर आली तरच दुसऱ्या व्यक्तीत संक्रमण होते.
मंकीपॉक्समुळे देशात महामारीसारखी स्थिती निर्माण होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. मंकीपॉक्स हा 50 वर्ष जुना आजार आहे. त्याच्याविरोधात तीन औषधे अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्याला रोखणे शक्य आहे. गेल्या 13 वर्षांत मंकीपॉक्सबाबत 7 वेळा जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबीणी जाहीर केली असली तरी कोरोनालाच महामारी घोषित करण्यात आलेले आहे. हा जनावरांपासून माणसांना होणारा आजार आहे. असे आजार अध्येमध्ये येत असतात. कोरोनासारखा याचा मोठा प्रसार होणे अवघड आहे.