नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. देशातील लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूबाधित प्रौढ व्यक्तीवर उपचार करण्यासाठी डीसीजीआयनं टोसिलिझुमाब (Tocilizumab) च्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्याची माहिती हेटेरो कंपनीद्वारे देण्यात आली आहे. DCGI ने टोसिलिझुमाबच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर डॉक्टर आता रुग्णालयात दाखल झालेल्या 18 वर्षांवरील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी टोसिलिझुमाब हे जेनेरिक औषध वापरू शकतील.
टोसिलिझुमाब हे औषध सिस्टमिक कॉर्टिकोस्टिरॉईड्स, अत्यावश्यक पूरक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) वर असलेल्या रुग्णांवर वापरले जाऊ शकते, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. कंपनीने देशातील टोसिलिझुमाब (टोसिरा) ला मंजुरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुंजुरी मिळणं आमच्या तांत्रिक क्षमता आणि कोविड विरोधातील कामाप्रती वचनबद्धता दर्शवते, असं कंपनीच्यावतीनं सांगण्यात आलं.टोसिलिझुमाबचं योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करु, असं हेटेरो कंपनीच्या प्रतिनिधींच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
टोसिलिझुमाबची जागतिक पातळीवरील कमतरता पाहता, भारतातील चांगल्या पुरवठ्यासाठी आपत्कालीन मान्यता महत्त्वपूर्ण आहे, असं हेटेरो समूहाचे अध्यक्ष डॉ बी पार्थ सारधी रेड्डी म्हणाले. भारतात TOCIRA (Tocilizumab) ची विक्री त्याची उपकंपनी ‘हेटेरो हेल्थकेअर’करेल. हेटेरो हेल्थकेअर देशभरात त्यांच्या मजबूत नेटवर्कद्वारे वितरणाचं काम करेल. त्यामधील असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी सतत काम केले जाईल, असं देखील पार्थ सारथी रेड्डी यांनी म्हटलं. हेटेरोचे बायोलॉजिक्स युनिट ‘हेटेरो बायोफार्मा’ हैदराबादमध्ये औषध तयार करेल.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 38 हजार 948 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 219 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 948 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 219 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 43 हजार 903 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 30 लाख 27 हजार 621 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 21 लाख 81 हजार 995 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 40 हजार 752 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 4 हजार 874 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 68 कोटी 75 लाख 41 हजार 762 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
इतर बातम्या:
पनवेल नवी मुंबईत महिला पुरोहित करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठापना
CGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults with EUA