मुंबई : धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आपला वेळ वाचवायचा आहे. अनेज जण कामाच्या व्यापामुळे दोन वेळेचे जेवणदेखील पूर्णपणे करीत नाहीत. मुख्य जेवण करण्यापेक्षा तात्पुरती भूक कमी करण्यासाठी बाहेरील प्रक्रिया केलेले अन्न, फास्टफूड आदींचा वापर करुन वेळ मारुन नेत असतात. तर काही लोक जेवण तर करतात परंतु अन्न नीट चावत नाहीत. पटकन जेवण (Fast eating) आटोपण्याच्या मागे असल्याने केवळ अचरवचर खाऊन पोट भरत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की घाईत जेवण करणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक (side effects) असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला विविध आरोग्य समस्यांचा (Health problems) सामना करावा लागू शकतो.
जलद खाण्याचे 5 तोटे-
1. शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही
खूप घाईत खाल्ल्याने जास्त खाण्याची सवय निर्माण होउ शकते. घाईघाईत खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषक तत्वेही मिळत नाहीत. जेव्हा आपण अन्न पटकन खातो तेव्हा आपण किती प्रमाणात खात आहोत, याची आपल्याला कल्पना नसते. जास्त खाण्याचे हेदेखील कारण आहे. त्यामुळे वजन वाढते आणि वजन वाढले की अनेक आजार आपल्याला घेरतात.
2. मेंदुला चुकीचा संदेश जातो
जेव्हा तुम्ही घाईघाईत अन्न खाता तेव्हा तुमच्या मेंदूला पोट भरले आहे किंवा आता भूक लागली आहे असा संदेशही मिळत नाही. त्यामुळे याचा परिणाम तुमच्या एकंदर विचारक्षमतेवरही होत असतो. त्यामुळे भराभर घाणे टाळावे.
3. जलद वजन वाढणे
घाईघाईत अन्न खाल्ल्याने जेवणात सुसुत्रता येत नाही. त्याचा परिणाम म्हणून जास्त जेवण केल्याने वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. जेवताना जर आपण अन्न योग्य प्रकारे चावले नाही तर शरीराला पोषक तत्त्वे मिळत नाहीत. आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
4. पचनक्रियेवर परिणाम
पटकन जेवन केल्याने पचनसंस्थेवरही परिणाम होतो. लोक घाईघाईने मोठमोठे घास घेतात आणि अन्न न चावता गिळतात. अनेक वेळा आपण पाणी पिल्यानंतर अन्न खातो. अशा परिस्थितीत अन्नाचे पचन नीट होत नाही आणि अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. पचनसंस्थेवर याचा परिणाम होतो.
5. मधुमेहाचा धोका
खूप वेळा अन्न नीट चावले नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते. आणि मग इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या वाढू लागते. यामुळे तुम्ही मधुमेहाच्या आजाराला बळी पडू शकता.
संबंधित बातम्या