Cinnamon Water : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्या, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

| Updated on: Oct 31, 2021 | 10:32 AM

दालचिनी हा एक खास मसाला आहे. चव आणि सुगंधासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा मसाला एक ग्लास पाण्यात चिमूटभर टाकल्यास शरीरातील इंसुलिन संवेदनशीलता आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे.

Cinnamon Water : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्या, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
दालचिनीचे पाणी
Follow us on

मुंबई : दालचिनी हा एक खास मसाला आहे. चव आणि सुगंधासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा मसाला एक ग्लास पाण्यात चिमूटभर टाकल्यास शरीरातील इंसुलिन संवेदनशीलता आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरही रुग्णांना दालचिनीचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

दालचिनीचे पाणी

दालचिनी आरोग्यासाठी आणि शक्तिशाली औषधी फायद्यांसाठी ओळखली जाते. याच कारणामुळे या मसाल्याचा उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. दालचिनी पाण्यात टाकल्याने शरीरातील विषारी पदार्थांसह अतिरिक्त साखर बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय गरम पाण्यात दालचिनी टाकल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

मधुमेहासाठी दालचिनी

एका संशोधनानुसार, दररोज तुमच्या आहारात फक्त 1 ग्रॅम दालचिनीचा समावेश केल्यास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारू शकते आणि टाइप-2 मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो. दालचिनीमधील अँटिबायोटिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुमच्या दैनंदिन आहारात थोड्या प्रमाणात दालचिनीचा समावेश केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास, चांगले पचन सुधारण्यास, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास, चांगली झोप घेण्यास आणि चयापचय वाढण्यास मदत होते.

दालचिनीचे पाणी कसे बनवायचे

यासाठी एका काचेच्या डब्यात एक लिटर पाणी घेऊन त्यात 1 इंच दालचिनीची काडी आणि 2-3 लिंबाचे तुकडे टाका. रात्रभर ठेवा आणि सकाळी हे पेय प्या. 2 कप पाणी घ्या आणि ते उकळवा, हे पाणी एका ग्लासमध्ये घाला आणि 2 दालचिनी घाला आणि चांगले मिसळा आणि सेवन करा. तुमच्या आहारात याचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

संबंधित बातम्या :

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Cinnamon Water is extremely beneficial for health)