उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या तोंड वर काढतात. केसांत कोंडा (dandruff) होणे, घामामुळे खाज सुटणे, केसांना दुर्गंधी येणे इत्यादी अनेक समस्या उन्हाळ्यात उद्भवतात. केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आपण ‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांचा वापर करून, केसांचे संरक्षण (Hair protection) करू शकतो. उन्ह्याळ्यात केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, खोबरेल तेल आणि कापूर दोन्ही मिसळून डोक्याला मसाज करा. या तेलामध्ये (Oil) दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन (कोकोनट ऑइल) सारखे पोषक घटक देखील आढळतात. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. दुसरीकडे, कापूरमध्ये सॅबिनीन, फेल्डरेनोन आणि लिमोनेन सारखे पोषक घटक असल्याने, ते केसांचे चांगल्या पद्धतीने केसांचे पोषण (Hair nutrition) करण्यास सहाय्यक ठरतात. चला तर मग, जाणून घेऊया उन्हाळ्यात केंसाचे संरक्षण करण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर वापराची योग्य पद्धत
खोबरेल तेल थोडावेळ उन्हात ठेवा, असे केल्याने ते थोडे गरम होईल. यानंतर त्यात बारीक कापूर टाका. ते चांगले मिसळा. आता त्यात टी ट्री ऑइलचे काही थेंब टाका. याने डोक्याला मसाज करा. हे तेल ३ ते ४ तास तसंच राहू द्या. आपण ते रात्रभर देखील केसांना लावून ठेवू शकता. यानंतर सकाळी केस सौम्य शाम्पूने धुवा. हे टाळू स्वच्छ करण्याचे काम करते. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.
टाळूची खाज दूर करते : उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये टाळूवर घामामुळे खाज येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही हे तेल वापरू शकता. हे तेल टाळूची खाज दूर करण्याचे काम करते.
केसांत खाज येणे आणि कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. यापासून आराम मिळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु ते केसांचे दीर्घकाळ नुकसान करतात. अशावेळी, आपण खोबरेल तेल आणि कापूर देखील वापरू शकता. हे केसांमधील कोंडा दूर करते. या तेलाने टाळूची चांगली मसाज करा. केसांमध्ये जर उवा असतील तर त्याही दूर होण्यास मदत होते.
कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसगळती सुरू होते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर हा रामबाण उपाय आहे.
( वरील टीप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा. )
इतर बातम्या-