नवी दिल्ली – रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास (high blood sugar) मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आपला आहार व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा त्रास वाढतो. डायबेटिक न्यूरोपॅथी हे एक प्रकारचे नर्व्ह डॅमेज आहे म्हणजेच मज्जातंतूचे नुकसान होते, ज्यामध्ये पायांना (feet care) सर्वात जास्त त्रास होतो. मायो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हाय डायबिटीस (diabetes)होतो तेव्हा हाय ब्लड शुगरमुळे शरीरातील संपूर्ण नसांवर परिणाम होऊ शकतो. तर डायबिटिक न्यूरोपॅथीमुळे पायांच्या नसांचे सर्वाधिक नुकसान होते.
मात्र याचा परिणाम हात सुन्न होणे, पचन तंत्र बिघडणे, मूत्रमार्ग , रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या कार्यावर देखील होतो. काही लोकांमध्ये लक्षणे कमी दिसून येतात, तर काही लोकांना खूप वेदनादायक आणि अक्षम समस्या उद्भवू शकतात. काही लोकांमध्ये याची लक्षणे कमी दिसून येतात, तर काही लोकांना खूप वेदना होऊ शकतात तसेच काही समस्याही उद्भवू शकतात.
ब्लड शुगर वाढल्याने पायांवर दिसू लागतात ही लक्षणे
– पायांना सूज येऊ लागणे हे रक्तातील साखर वाढण्याचे लक्षण असू शकते.
– पायाला झालेली जखम लवकर न भरणे, हेही हाय ब्लड शुगरमुळे होऊ शकते.
– पाय सुन्न पडणे अथवा बधीर होणे.
असा करा बचाव
– ज्या लोकांना मधुमेह झाला आहे त्यांनी वर्षातून 2 वेळा ब्लड शुगर लेव्हल तपासावी.
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करून योग्य पदार्थांचे सेवन करावे.
– औषधे नेळेवर व नियमितपणे घ्यावीत तसेच शारीरिक हालचाल वाढवावी, झेपेल तसा व्यायाम करावा.
अशी घ्या पायांची काळजी
पायांची तपासणी करावी – रोज पाय तपासावेत. एखादा फोड, कापणे, खरचटणे, फाटलेली आणि सोललेली त्वचा, पायावर लालसरपणा दिसल्यास अथवा सूज येत असेल तर त्यावर उपाय करा. आपल्या पायांचे काही भाग तपासण्यासाठी इतर व्यक्तींची मदत घ्या.
आपले पाय कोरडे ठेवा – आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा. पाय दररोज कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने धुवा. पाय जास्त काळ भिजवू नका. पाय आणि बोटांच्या मधला भाग नीट पुसून कोरडे करा.
क्रीम लावा – पायांना मॉयश्चराइझ करा. त्यामुळे भेगा पडत नाहीत. मात्र पायाच्या बोटांच्या दरम्यान लोशन लावू नका. असे केल्याने बुरशीचे प्रमाण वाढू शकते.
नियमितपणे नखं कापा – पायांच्या बोटांची नखं वेळच्या वेळी कापावीत. फायलरच्या मदतीने नखांच्या कडा नीट तासाव्यात. तुम्हाला ते नीट जमत नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्या.
कोरडे मोजे, बूट घाला – पायात स्वच्छ व कोरडे मोजे घालावेत. सुती कापडाचे , मऊ मोजे वापरावेत. घट्ट व जाड मोजे वापरणे टाळावे. चांगल्या प्रकारे फिट होतील असे शूज घाला. आपल्या पायांचे संरक्षण करण्यासाठी चांगले शूज किंवा चप्पल घालावी.