मुंबई : वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes) आणि शुगरमुळे अनेकजण साखर खाणे सोडतात. विशेष: ज्यांना वजन कमी करायचे आहे, असे लोक तर साखरेपासून चार हात लांबच राहतात. साखरेमुळे वजन वाढते हे खरे आहे. मग साखरेऐवजी पर्याय शोधले जातात. यामध्ये मध सर्वात आघाडीवर आहे. ज्यांना साखर (Sugar) खायची नाही, असे लोक सर्रासपणे मधाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तसेच गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने बरेच लोक गूळ खाण्यावरही भर देतात. मग काय एखाद – दोन वर्ष लोक साखरेला स्पर्श देखील करत नाहीत. मात्र, हे जाणून तुम्हाला नक्कीच आर्श्चय वाटेल की, साखर खाणे टाळणे देखील आपल्या आरोग्यासाठी धोकादायक (Dangerous) आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीचा अतिरेक आणि कमी आपल्या शरीरासाठी घातक आहे.
ऊसापासून प्रक्रिया केलेल्या साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, त्यात कोणतेही पौष्टिक मूल्य नसले तरी नैसर्गिक साखरेमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी साखर मदत करते. त्यामुळे पूर्णपणे साखर सोडून देणे हा चांगला निर्णय नाही. परंतु दररोज आहारामध्ये घेणे टाळा. कधी कधी साखरेचे सेवनही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे.
काही लोक अचानकपणे साखर खाणे सोडतात. यामुळे त्यांच्या शरीरामधील ऊर्जाही कमी होते. यामुळे एकदम साखर खाणे अजिबात सोडू नका. कधीतरी साखर खाणे चांगले आहे. मात्र, जिथे अतिरेक होते तिथे समस्या अधिक निर्माण होतात. साखर टाळण्यासाठी आपण चहामध्ये गूळ घालू शकता. कारण आपण दिवसातून अनेक वेळा चहाचे सेवन करतो. त्यामुळे साखरेचे अतिरिक्त सेवन केले जाते.
पांढर्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ब्राउन शुगर चयापचय दर वेगाने वाढवते. हे भूक कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, याचे अति सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्यांना आपल्या आहारामध्ये ब्राऊन शुगरचा समावेश करावा.
ब्राउन शुगर पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे पोटा संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करण्यात मदत करते. पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आपण रात्री झोपताना एक ग्लासमध्ये एक चमचा ब्राऊन शुगर मिक्स करून ते पाणी प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.