हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसा खवखवणे हे सामान्य आजार आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात. या उपचारांपैकी एक अतिशय प्रभावी मानल्या जाणारा उपाय म्हणजे मध आणि जेष्ठमधाचे सेवन. आयुर्वेदामध्ये जेष्ठमध आणि मध अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याचे सांगितल आहे. हिवाळ्यात मध आणि ज्येष्ठमध खाण्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया.
ज्येष्ठ मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जसे की दाह विरोधी, ऑक्सिडेंट्स आणि प्रतिजैविक. त्यासोबतच मधामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट सारखे अनेक पोषक घटक देखील असतात. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे त्याचे सेवन फायदेशीर मानल्या जाते.
ज्येष्ठमध आणि मधाचे सेवन कसे करावे
गरम पाण्यात मध आणि ज्येष्ठमध मिसळून पिऊ शकता.
तुम्ही चहामध्ये ज्येष्ठमध टाकून पिऊ शकता.
तुम्ही ज्येष्ठमध चघळू शकतात किंवा मधात मिसळूनही खाऊ शकतात.
हिवाळ्यात मध आणि जेष्ठमध खाण्याचे फायदे
घसादुखी कमी करण्यासाठी मध आणि ज्येष्ठमध दोन्ही गुणकारी आहेत. ज्येष्ठमधामुळे घशाला आराम मिळतो. आणि मध जळजळ कमी करते.
ज्येष्ठमध आणि मधामध्ये असलेल्या अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म खोकला आणि सर्दीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. ज्येष्ठमध घशाची जळजळ कमी करते आणि मध कफ पातळ करण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करते.
मध आणि ज्येष्ठमध हे दोन्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. जेष्ठ मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट शरीराला मुक्तरॅडिकल्स पासून वाचवतात आणि मधामध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.
ज्येष्ठमध आणि मध दोन्ही तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे चांगली झोप लागते आणि शरीराला विश्रांती मिळते.
मध आणि ज्येष्ठ मध दोन्ही पचन सुधारण्यास मदत करतात. ज्येष्ठमध पचन एन्झाईमचे उत्पादन वाढवते आणि मध पचनसंस्थेला पचनक्रिया योग्य करण्यास मदत करतो.