जिरे, धणे आणि बडीशेपच्या पेयाचे सेवन करा आणि हे आरोग्य फायदे मिळवा!

| Updated on: Apr 26, 2022 | 11:43 AM

वजन कमी करण्याआधी पचनसंस्थेसाठी निरोगी असणे आवश्यक आहे. जिरे, धणे आणि बडीशेपचे पाणी पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी या खास पेयाचे सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, जिरे, धने आणि बडीशेपच्या पेयाचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

जिरे, धणे आणि बडीशेपच्या पेयाचे सेवन करा आणि हे आरोग्य फायदे मिळवा!
जगात सर्वाधिक कोणते 10 ड्रिंक्स प्यायले जातात, घ्या जाणून..
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : वजन कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे व्यायाम महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आहारही (Diet) खूप जास्त महत्वाचा आहे. आपण काय खातो आणि काय पितो यावर आपले वजन ठरलेले असते. बहुतेक लोक डिटॉक्स ड्रिंकचे सेवन वजन कमी करण्यासाठी करतात. डिटॉक्स ड्रिंक्स (Drinks) बनवण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. मात्र, आपण घरातील काही साहित्याच्या मदतीने घरचे-घरी डिटॉक्स ड्रिंक तयार करायला हवे. ही पेये आरोग्य (Health) चांगले ठेवतात, तर त्वचेला तजेलदार बनवण्यासही मदत करतात. ही पेय नेमकी कोणती आहेत आणि घरी कशी तयार करायची याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करण्याआधी पचनसंस्थेसाठी निरोगी असणे आवश्यक आहे. जिरे, धणे आणि बडीशेपचे पाणी पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी या खास पेयाचे सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, जिरे, धने आणि बडीशेपच्या पेयाचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर वजन कमी करण्याच्या नादामध्ये अतिरेक झाला तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती

कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक पेयांचे सेवन केले. तर जिरे, धने आणि बडीशेपचे हे पेय वजन कमी करण्यासाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्वाचे आहे आणि या पेयातून आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. यामुळे हा पेयाचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. वजन कमी होण्यासोबतच व्हिटॅमिन सी वाढण्यासही मदत होईल.

तजेलदार त्वचा

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जिरे, धणे आणि बडीशेपचे पेय घेतल्याने आपली त्वचा उन्हाळ्यातही तजेलदार राहण्यास मदत होते. बडीशेप हार्मोन्स संतुलित करते. यासोबतच हे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. एका संशोधनातून समोर आले आहे की बडीशेप कर्करोगाचा धोका कमी करू शकते. जर आपल्या उन्हाळ्याच्या हंगामामध्येही चांगली त्वचा हवी असेल तर या पेयाचे सेवन करा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Weight Loss : चयापचय वाढवण्यासाठी दररोज या पेयांचे सेवन करा आणि वजन कमी करा!

Health | ‘व्हिटॅमिन सी’युक्त हे शॉट्स शरीराला निरोगी बनवतात, आजच आहारामध्ये समाविष्ट करा!