मुंबई : धन्याचा (Coriander) वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. धने पदार्थाला चवदार बनवण्यास मदत करतात. तसेच धन्याचा सुगंध भाजीत एक वेगळीच चव आणतो. धन्याचा मसाले तयार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ते बारीक करून पावडरच्या स्वरूपात सर्व भाज्यांमध्ये टाकले जाते. इतकेच नाही तर धने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहेत. धन्याच्या मदतीने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला खास वजन कमी करण्यासाठी धने कशाप्रकारे मदत करतात, हे सविस्तरपणे सांगणार आहोत. जर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी धन्याच्या पाण्याचे सेवन केले तर वाढलेल्या वजनाची समस्या (Problem) कायमची दूर होण्यास मदत होईल.
आजकाल लठ्ठपणाची समस्या खूप वाढली आहे. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर धने पाणी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. धने पाणी चयापचय प्रक्रिया गतिमान करते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होऊ लागते. फक्त दररोज सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करणे चांगले. तसेच आपण व्यायामाला जाण्याच्या अगोदर हे पाणी पिलेतर आपल्या शरीरावरील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.
सध्याच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना थायरॉईडची समस्या जाणवत आहे. हा हार्मोनल प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे त्यांचे पीरियड सायकलही अनेकदा बिघडते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर धने पाणी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते, हे पाणी थायरॉईड हार्मोनची कमतरता किंवा जास्ती दोन्हीमध्ये फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत करतात.
यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी देखील धने पाणी चांगले मानले जाते. याशिवाय किडनीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी देखील ते फायदेशीर मानले जाते. धने पाणी तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. जर तुम्हालाही अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर हे पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. विशेष म्हणजे दिवसभरामधून आपण कधीही धने पाण्याचे सेवन करू शकता. धने पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.