Corona JN 1 Strian | कोरोना पुन्हा एकदा प्राणघातक ठरु लागलाय. मागच्या 24 तासात देशात कोरोना संक्रमणामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये तिघांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय कर्नाटकमध्ये दोन आणि पंजाबमध्ये कोरोना संक्रमणामुळे एक मृत्यू झालाय. मागच्या दोन आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा 22 पर्यंत पोहोचलाय. त्याशिवाय नव्याने रुग्णसंख्याही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एक्टिव झाले आहेत. कोरोनाचा नवीन वेरिएंट JN.1 च्या ट्रॅकिंगचा वेग वाढवण्यात आलाय.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतेय. केरळ सर्वाधिक डेंजर झोनमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या रिपोर्ट्नुसार मागच्या 24 तासात देशात 358 रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. यात कोरोनाच्या 300 केसेस एकट्या केरळमधील आहेत. कोरोनामुळे मागच्या 24 तासात 6 मृत्यू झाले आहेत. देशात एक्टिव केस 2669 आहेत. केरळमध्ये एक्टिव रुग्ण संख्या वाढून 2341 झालीय. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्यामते केरळमध्ये कोरोना रुगणसंख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय नाही. राज्यात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे.
Delhi-NCR मध्ये कोरोना रुग्ण
दिल्ली आणि NCR मध्ये कोरोना पोहोचलाय. बुधवारी दिल्लीत तीन आणि गाजियाबादमध्ये एक कोरोना रुग्ण सापडला. खास म्हणजे गाजियाबादमध्ये सात महिन्यानंतर कोरोना रुग्ण सापडलाय. त्याशिवाय नोएडामध्ये सुद्धा कोरोनाची एक केस रिपोर्ट झालीय. दिल्लीत कोरोनाचा सब वेरिएंट JN.1 पोहोचल्याची शक्यता आहे. आतापर्यंत तीन राज्यात याची पुष्टि झालीय. आतापर्यंत संक्रमित रुग्णांचे सॅम्पल जीनोम सीक्सवेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
नव्या वेरिएंटच काय लक्षण?
कोविडचा नवीन वेरिएंट JN.1 मध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, गळ्यात त्रास आणि ताप येतो. आरएमएल रुग्णालयाचे डॉक्टर अजय शुक्ला यांनी सांगितलं की, जितकेही कोविडचे नवीन केसेस समोर येतायत, त्यांचं जीनोम सीक्वेंसिंग केलं जातय. जेणेकरुन नव्या वेरिएंटबद्दल समजेल. नोएडाचे सीएमओ डॉक्टर सुनील कुमार शर्मा यांनी सांगितलं की, आमच्याकडेही कोविड रुग्ण आढळलेत. संक्रमित रुग्णाच वय 58 आहे. त्यांच्या सॅम्पलच जीनोम सीक्वेंसिंग केलं जातय.