नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती विकसित होते, जी केवळ ओमिक्रॉनच नाही तर डेल्टासह इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते. आयसीएमआरने (ICMR) केलेल्या निरीक्षणात असे आढळून आले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, ओमिक्रॉन-निर्मित प्रतिकारशक्ती व्हायरसच्या डेल्टा प्रकाराला थोपवू करू शकते. यामुळे डेल्टा पासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. यामुळे डेल्टाचा प्रसार संसर्ग संपुष्टात येईल, असेही मत अभ्यासात मांडण्यात आले आहे. या संशोधनात ओमिक्रॉनवर लस बनविण्यावर भर देण्यात आला आहे. AstraZeneca, Moderna, Pfizer यासह इतर अनेक कंपन्या नवी लस बनवण्याच्या तयारीत आहेत. असा दावा केला जात आहे की मार्चच्या अखेरीस ही लस ओमिक्रॉनला टक्कर देण्यासाठी बाजारात येईल.
PTI च्या वृत्तानुसार, ICMR ने एकूण 39 लोकांचा अभ्यास केला, त्यापैकी 25 जणांनी AstraZeneca च्या अँटी-कोरोनाव्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतले, तर आठ जणांनी Pfizer लसीचे दोन्ही डोस घेतले, तर सहा जणांनी कोरोनाची कोणतीही लस घेतली नव्हती. याशिवाय 39 पैकी 28 लोक यूएई, आफ्रिकन देश, मध्य आशिया, अमेरिका आणि ब्रिटनमधून परतले होते, तर 11 लोक उच्च जोखमीच्या संपर्कात होते. या सर्व लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली होती. या अभ्यासात कोरोना विषाणूचा पुन्हा संसर्ग होण्यासाठी आयजीजी अँटीबॉडी आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी (एनएबी) चा अभ्यास करण्यात आला.
अहवालात म्हटले आहे की, “आम्हाला असे आढळून आले आहे की ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे, हे अँटीबॉडी ओमिक्रॉन आणि डेल्टासह इतर प्रकारच्या कोरोनाला निष्प्रभावी करू शकते.” हे लसीकरण न केलेल्या गटातील सहभागींची संख्या आणि संसर्गानंतरच्या अल्प कालावधीमुळे होते. लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये ओमिक्रॉन विरूद्ध प्रतिकारशक्ती कमी होण्याचे हे एक कारण असू शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केलेल्या या अभ्यासात प्रज्ञा डी यादव, गजानन एन सपकाळ, रिमा आर सहाय आणि प्रिया अब्राहम यांचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेत ही एक मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे.