नवी दिल्ली : काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये थोडी घट झाली आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे 18,193 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच् कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता 182 ने ही संख्या कमी झाली आहे. तसंच कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने ही दिलासादायक बाब आहे.सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 284 आहे. ओमायक्रॉन (Omicron) चं नवीन सब-व्हेरियंट BA.2.75 चा देशात शिरकाव झाल्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याविषयी शनिवारी तज्ज्ञांची महत्त्वाची बैठक होणार आहे. आतापर्यंत देशातील फक्त 4.80 कोटी (5.11%) लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर 63.19 कोटी लोकांना दुसरा डोस मिळून 6 महिने झाले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
काल दिवसभरात देशात कोरोनाचे 18,193 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच् कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता 182 ने ही संख्या कमी झाली आहे. तसंच कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने ही दिलासादायक बाब आहे.सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 284 आहे.
कालच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये देशातील सर्वाधिक 3310 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. परंतु, केरळमध्ये नवीन रुग्णांमध्ये 10% घट झाली आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णांच्या वाढीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात नवीन रुग्णांच्या संख्येत 10% ची वाढ दिसून झाली आहे.
केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या पाच राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मागच्या काही दिवसांच्या तुलनेत नव्याने कोरोना संक्रमित लोकांमध्ये 2% वाढ झाली आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये नवीन कोरोना रुग्णांमध्ये 2% ची घट नोंदवली गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 1 लाख 47 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.