मुंबईः जगभरात Omicron चा प्रसार होत असताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी मात्र मंगळवारी जाहीर केले की ते लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर कोविड-19 चा बूस्टर डोस देणार आहेत. तर, या विरोधात UN एजन्सी याच्या अगदी उलट होते. डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत, WHO कडून वारंवार सांगितले जात होते की निरोगी लोकांसाठी बूस्टर डोसची गरज नाही. प्रत्येकाला बूस्टर डोस (booster dose) दिल्यास अनेक लोकांना बूस्टर देणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनीच याबाबत डिसेंबर 2021 मध्येच बूस्टर डोसवर स्थगितीचे आदेश(Order)दिले होते. तर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना डोस देण्यास सुरुवात केली होती. यावेळी गरीब देशांनी श्रीमंत देशांना लस देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गरीब देश आपल्या नागरिकांना लस देऊ शकले असते.
WHO ने 8 मार्च रोजी जाहीर केलेल्या निवेदनात, म्हटले होते की, कोविड-19 लसींचे बूस्टर डोस हे मृत्यूपासून नागरिकांचे संरक्षण करतात. त्यावेळी काही वैज्ञानिकांचे मत होते की, प्रतिकारशक्ती सुधारण्यास याचा उपयोग होतो. यूके, कॅनडा आणि यूएस या श्रीमंत देशातील या बूस्टर डोसच्या कार्यक्रमामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग कमी झाला आहे.
बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार यांनी डॉ. आदित्य चौटी यांनी TV9 बरोबर बोलताना सांगितले की, या डोसमुळे Omicron झाल्यावरही शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम केले आहे. पण त्या उद्भभवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी हा डोस कमी पडतो असंही त्यांनी सांगितले.
त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितले की, “ओमिक्रॉनची आलेली लाट ही कोरोनाएवढी गंभीर नव्हती. त्यामुळे निर्माण झालेल्या संकटामुळेच काही लोकांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. कोरोनानंतर अनेक संकटं लोकांवर आली त्यामध्ये डेल्टाचीही एक लाट आली त्यामुळे इथून पुढेही अशा संकटांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आतापासूनच सुरक्षित राहणे चांगले आहे.
डॉ. आदित्य यांनी सांगितले की बूस्टर डोस केवळ वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन कामगार किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठीच नाही तर सर्वांसाठी गरजेचा आहे. जेव्हा प्रत्येकाला बूस्टर डोस देण्याची परिस्थिती असते त्यावेळी प्रत्येकाला डोस कसा मिळेल याची काळजी घेतली पाहिजे.
भारतात आतापर्यंत 1.96 कोटींहून अधिक बूस्टर डोस दिले गेले आहेत असे सांगण्यात येत असले तरी हा आकडा अजून ग्राह्य मानला जात नाही. पहिल्या टप्प्यात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कमी डोस देण्यात आले. मात्र नंतर हा आकडा वाढत जाऊन आता कालपर्यंत 1 लाखाच्या बाहेर हा आकडा गेला आहे.
डब्ल्यूएचओकडून कोविड लसी बाबत नेहमीच वेगवगेळी मतं मांडण्यात आली. त्यामुळे कोरोनानंतर आलेल्या वेगवेगळ्या साथीच्या आजराबाबत ठामपणे भूमिका घेतली नसल्यामुळे डब्ल्यूएचओकडून फक्त अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यांना लसीकरण, प्रतिकारशक्ती आणि बूस्टर डोस सगळ्यांना दिलाच पाहिजे हेच त्यांनी सतत सांगत आले आहेत.
या सगळ्यावर नुकताच डब्ल्यूएचओकडून एक स्पष्टीकरण करण्यात आले आहे की, ओमिक्रॉनच्या जगभरातील प्रसारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यामध्ये BA.2 नावाच्या नवीन COVID प्रकाराचा यामध्ये समावेश आहे. ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या प्रकरणांनंतर BA.2 ने काही लोकांना पुन्हा संसर्ग झाल्याचे सांगून त्या रोगावर चांगली लस असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या