लस घ्यायला गेला आणि कोरोना झाला असं होऊ नये म्हणून काय करावं? लसीकरण केंद्रावर काय काळजी घ्यावी?

| Updated on: Jan 09, 2022 | 12:16 PM

केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे. फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

लस घ्यायला गेला आणि कोरोना झाला असं होऊ नये म्हणून काय करावं? लसीकरण केंद्रावर काय काळजी घ्यावी?
कोरोना लसीकरण
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे. फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. लसीचा बुस्टर डोस घ्यायला गेला आणि कोरोना झाला असं होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. नेमकी काय काळजी घ्यायची हे देखील आपण ठरवणं गरजेचं आहे.

लसीकरण केंद्रावर कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?

ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घ्यायला जाताना संपूर्ण शरीर झाकलेले असेल अशा प्रकारची कपडे परिधान करावीत. दोन मास्कचा वापर करावा. एक मास्क हा सर्जिकल मास्क असावा. बाहेरचा मास्क हा N-95 चा असावा. मास्कला वारंवार हात लागणार नाही, अशा प्रकारे ते व्यवस्थित घातलेले असावेत. दोन मास्क वापरल्यानं सुरक्षा होते.

फेसशील्डचा वापर करावा का?

कोरोना लसीकरण केंद्रावर जाताना फेस शील्डचा वापर केल्यास ते देखील उपयोगी ठरेल. सॅनिटायझरचा वापर देखील करावा. त्यासाठी सॅनिटायझरची छोटी बाटली सोबत ठेवा.

लसीकरण केंद्रावर रांग असल्यास काय करावं?

कोरोना लसीकरण केंद्रावर मोठी रांग असल्यास बुस्टर डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रावर रांगेत उभ राहण्याऐवजी तरुणांना रांगेत उभं करावं. लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. दोन मीटरचं अंतर राखावं.

घरी पोहोचल्यावर काय काळजी घ्यावी?

लसीकरण केंद्रावरुन बुस्टर डोस घेऊन आल्यानंतर सुरुवातीला बाथरुममध्ये साबणाच्या सहाय्यानं हात पाय स्वच्छ करावेत. त्यानंतर चेहरा, तोंड, नाक स्वच्छ करुन घ्याव. यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यावं.

लस कशी मिळणार?

बुस्टर डोस घ्यायचा असल्यास त्यांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. कोविन पोर्टलवर नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर गेल्यास त्यांना तिथंही लस मिळते.

इतर बातम्या:

किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु, 10 ते 12 वयोगटातील मुलांना का लस नाही? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Corona |कोरोनाच्या नवीन नियमावलीबाबत ब्युटी पार्लर व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी ; काय आहे मागणी

Corona Vaccination started for frontline workers and senior citizen for comorbid people know some details to follow on vaccination center