Corona : जगभरात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, कोरोना विषाणूची चौथी लाट (The fourth wave of corona virus) येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या 15 दिवसांत भारतातही कोरोनाची प्रकरणे शिगेला पोहोचतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम (Different results) होतो. काही लोकांना या विषाणूमुळे गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. तर काही लोकांमध्ये या विषाणूची फक्त सौम्य लक्षणे दिसतात. काही लोक पूर्णपणे लक्षणे नसलेले रुग्णही असू शकतात. लक्षणे नसलेल्या लोकांच्या शरीरात या विषाणूची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु ते इतरांना सहजपणे संक्रमित करू शकतात. म्हणूनच एखादी व्यक्ती लक्षणे नसलेला कोविड वाहक (Asymptomatic covid carrier) आहे की नाही हे कसे शोधायचे हे अनेकांना समजत नाही. लक्षणे नसलेला कोविड वाहक कोणाला म्हणतात आणि तुम्ही तसे वाहक तर नाहीत ना याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
काही लोकांमध्ये विविध कारणांमुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जसे की, तरुणांची प्रतिकारशक्ती वृद्धांपेक्षा मजबूत असल्याने, त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की विशेषत: 6 ते 13 वयोगटातील मुलांना कुठलेही लक्षणे नसतात कारण त्यांना श्वसनाचे आजार होण्याची अधिक शक्यता असते. तथापि, जेव्हा या वयातील मुलांना कोरोना होतो तेव्हा ते कमी धोकादायक असते. याशिवाय, रोगाच्या तीव्रतेची पातळी एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण स्थितीवर आणि एखाद्या व्यक्तीमध्ये दीर्घकालीन संसर्गामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असते.
तुम्ही लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण आहात की नाही हे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे RT-PCR आणि जलद प्रतिजन चाचणी करणे. कोरोनाच्या संपर्कात आल्यानंतरही तुमच्या शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी तुम्ही तुमची चाचणी नक्कीच करून घ्यावी. तसेच तुम्ही स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवणे फार महत्वाचे आहे.
कोरोनाची सामान्य लक्षणे सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, तसेच ताप, डोकेदुखी, वास न येणे, घसा खवखवणे, नाक वाहणे… यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. याशिवाय अंगदुखी, त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ आणि लालसरपणा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही लोकांना जाणवत आहेत. ज्यांना नुकतेच Omicron BA.2 ची लागण झाली आहे त्यांच्यात देखील मळमळ, अतिसार, उलट्या, ओटीपोटात दुखणे, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यासारख्या ओटीपोटाच्या सिंड्रोमची लक्षणे दिसून आली आहेत.
तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसतो की नाही, पण तुम्ही सतर्क राहणे फार महत्वाचे आहे. तुम्हाला लक्षणे नसल्यास, तरीही तुम्ही इतरांना संक्रमित करू शकता. त्यामुळे मास्क घाला, कोविड स्वच्छतेच्या नियमांचे पालन करा आणि लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणेही तितकेच आवश्यक आहे.