मुंबई : दही खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्व असतात. दही थंड आहे. ज्यामुळे ते गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता देते तसेच पचनक्रिया सुधारते, तोंडाचे अल्सर बरे करण्यास, पोटाची उष्णता कमी करणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. (Curd is beneficial for controlling cholesterol and blood pressure)
विशेष म्हणजे दररोजच्या आहारात आपण दह्याचा समावेश केला तर कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.
केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दररोज दहीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि उच्च रक्तदाब कमी होण्याचा धोका देखील कमी होतो.
दही आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवते. दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -2, बी -12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दहीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे कॉर्टिसॉल कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. दहीचे सेवन केल्यावर बऱ्याच वेळ पोट भरल्या सारखे वाटते.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर…https://t.co/YDbnEdsqyG | #Sweat | #Body | #Health | #immunesystem | #healthcaretips | #Skincare | #immunity |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2021
(Curd is beneficial for controlling cholesterol and blood pressure)