dark chocolate weight loss
मुंबई: हल्ली लोकांचं वेगानं वजन वाढतंय. पण प्रत्येकाला स्वत:ला फिट ठेवायचं असतं. त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक डायटिंग, एक्सरसाइज सारख्या पद्धतींचा अवलंब करतात, पण या सगळ्यानंतरही काही लोक वजन कमी करत नाहीत, कंटाळा करतात किंवा तसं त्यांचं स्वतःवर नियंत्रण नसतं. पण आता तुम्ही मिठाई खाऊन देखील वजन कमी करू शकता. होय, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आता तुम्ही चॉकलेट खाऊन वजन कमी करू शकता. डार्क चॉकलेट ही तशी न आवडणारी गोष्ट आहे कारण ती चवीला कडू असते. पण शेवटी तो चॉकलेटचाच प्रकार समावेश तर मिठाईमध्येच! चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन कसे करावे?
वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे खा डार्क चॉकलेट
- डार्क चॉकलेट खाणं हे व्यसनासारखं असू शकतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करताना एक मर्यादा बनवा. दिवसातून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर डार्क चॉकलेटचे एक किंवा दोन तुकडे खाल्ल्याने तुमची गोड खाण्याची लालसा कमी होते. त्यामुळे लंच किंवा डिनरनंतर डार्क चॉकलेट खाऊ शकता.
- वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट स्मूदी किंवा मिल्क शेक बनवून पिऊ शकता. पण डार्क चॉकलेट स्मूदी बनवताना त्यात चॉकलेटची जास्त भर पडणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी तुम्ही एक कप दुधात 2 क्यूब चॉकलेट घालून शेक बनवून पिऊ शकता.
- 24 तासात डार्क चॉकलेटचे दोन तुकडे खाल्ल्याने शरीराला १९० कॅलरीज मिळतात. ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास आणि आकार राखण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही काहीही विचार न करता डार्क चॉकलेट खाऊ शकता.
- डार्क चॉकलेट कॉफी वजन कमी करण्यास देखील मदत करते. संध्याकाळच्या पेयांसाठी डार्क चॉकलेट कॉफी सर्वोत्तम मानली जाते. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)