मुंबई : आपण वर्षभराहून अधिक काळ जागतिक महामारीचा सामना करत असून, कोविड-19 मुळे होणारी आणि काही वेळा दीर्घ काळ टिकणारी एक गुंतागुंत समोर आली आहे. ही गुंतागुंत आहे, वास घेण्याची क्षमता (“अॅन्सोमिआ”) किंवा चव घेण्याची क्षमता (“अॅगेशिआ”), आणि काही वेळा या दोन्ही क्षमता गमावल्या जातात. अमेरिकेतील एका प्रमुख मासिकाच्या मते, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या जवळजवळ 86% रुग्णांनी वास घेण्याची क्षमता गमावल्याचे सांगितले आहे. इतकीच संख्या तोंडाची चव गेलेल्या रुग्णांचीही आहे. अशी तक्रार असलेले सहा दशलक्षहून अधिक रुग्ण असून ही संख्या वाढतेच आहे (Decreased ability to smell and taste after corona Then try this recipe by Dr Jennifer Prabhu).
सुदैवाने, चव व वास या क्षमता कमी झालेल्या रुग्णांना अन्न सेवन करण्यास मदत व्हावी, या दृष्टीने डॉक्टर, पोषणतज्ज्ञ व थेरपिस्ट यांच्याकडे आधीच काही उपाय आहेत. याविषयी सांगताना MT (ASCP), FAAP, FACP, सिरसी हेल्थ प्रा.लि.च्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. जेनिफर प्रभू (Dr Jennifer Prabhu) म्हणतात, रेडिएशन किंवा केमोथेरपी असे दीर्घकाळ चालणारे वैद्यकीय उपचार घेतल्याने या संवेदना कमी झालेल्या रुग्णांसाठी आम्हाला यापूर्वी उपाय करावा लागला आहे. तसेच, हे प्रश्न अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत. या संवेदना पुन्हा याव्यात यासाठी काही विशिष्ट पाककृती, चवी आणि पदार्थ वापरले जातात. असंख्य लोक इतक्या तीव्र स्वरूपामध्ये आजारी पडत असताना, या संवेदनांचा विचार करणे चुकीचे वाटू शकेल, पण या संवेदना गमावल्या तर तुमच्या मानसिक आरोग्यावर व शारीरिक आरोग्यावरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो (जसे वजन घटणे, अपुरे पोषण होणे, इ.). काही “वासासाठी व्यायाम” जाणून घेऊया आणि त्यास मदत करू शकतील अशा पाककृती पाहूया…
ओलफॅक्टरी (स्मेल) नर्व्हना चालना देऊ शकतील आणि त्यांना पूर्वपदावर आणू शकतील, अशा काही दैनंदिन सवयी आहेत – काही गंधांचा वास घेणे, यास वैद्यकशास्त्रामध्ये “स्मेल ट्रेनिंग” असे म्हणतात. विविध प्रकारचे वास रोज जाणूनबुजून हुंगले, तर तुमच्या संवेदना पूर्वपदावर येण्यासाठी मदत होते, असे अभ्यासातून समोर आले आहे. हे वास म्हणजे लवंग किंवा दालचिनी अशा तीव्र वासाच्या मसाल्यांचे असू शकतात, किंवा लेवेंडर किंवा लिंबू अशा इसेन्शिअल ऑइलचे असू शकतात.
दिवसातून दोन वेळा, किमान चार वास प्रत्येकी 15 सेकंद तरी हुंगले पाहिजेत. यातून तुमच्या विचारांना व मनालाही चालना मिळते. यापैकी एखादा वास तुम्हाला येत नसेल, तर तो वास कसा असतो हे आठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नर्व्ह कार्यरत होतील आणि आपोआप त्या वासाशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतील!
याचबरोबर आहारात पाककृतींच्या काही विशिष्ट घटकांचा देखील समवेश करा.
1) आंबट – लोणचे, लिंबू किंवा चिंच अशा एखाद्या आंबट पदार्थाने जेवणाची सुरुवात केली, तर लाळ ग्रंथींना चालना मिळत असल्याने सिद्ध झाले आहे. यामुळे जेवणातील अन्य चवी तुमच्या चव घेण्याच्या संवेदनांना शोधता येऊ शकतात.
2) उमामी – जपानीमध्ये उमामीचा शब्दशः अर्थ आहे “स्वादिष्टपणाची झलक”. यास आता पाचवी चव मानले जाते (गोड, आंबट, कडू व खारट यासह). सोय सॉस, लसूण, मिसो, मश्रूम, बटाटे व ट्रफल असे उमामी पदार्थही लाळ ग्रंथींना चालना देतात.
3) तिखट – अनेक तिखट पदार्थांमध्ये असलेल्या कॅप्सेसिन या घटकामुळे ओलफॅक्टरी (स्मेल) नर्व्हचे व संबंधित ग्रंथींचे कार्य सुधारण्याची क्षमता प्राप्त होते. नाकातील मार्गिकांमध्ये अडथळे आले असतील, तर ते दूर करण्यासाठीही यामुळे मदत होते.
4) चॉकलेट – चॉकलेट खाण्यासाठी कोणतेही कारण चालते ना? चव घेण्याची क्षमता गेली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी अनेकदा केवळ चॉकलेट खाणे उपयुक्त ठरते.
5) स्वरूप – वर नमूद केल्याप्रमाणे, एका पदार्थामध्ये निरनिराळ्या स्वरूपाचे घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मऊ पदार्थ नको वाटत असतील, तर थोडे करकुरीत पदार्थ समाविष्ट करा. काही वेळा अन्न पदार्थांपेक्षा पातळ पदार्थ घेणे सोयीचे वाटते (शेक किंवा सूप).
6) तापमान – अनेक कोरोना रुग्णांना गरम किंवा कोमट पदार्थांऐवजी थंड किंवा फ्रोझन पदार्थ बरे वाटतात, असे अभ्यासात आढळले आहे. गरम पदार्थ खाण्याचा विचार तुम्हाला त्रासदायक वाटत असेल. तर तो पदार्थ गरम न करता खाण्याचा विचार करा किंवा फ्रुट स्मूदी किंवा कोल्ड सिरप घ्यायचा विचार करा.
7) सातत्य महत्त्वाचे – हताश किंवा निराश न होण्याचा प्रयत्न करा. चव घेण्याच्या संवेदना पुन्हा जागृत व कार्यरत होण्यासाठी सतत प्रयत्न करणे व निरनिराळ्या चवी चाखून बघणे गरजेचे आहे. या आठवड्यात एखादे विशिष्ट अन्न बेचव वाटत असेल, तर काही दिवसांनी ते पुन्हा खऊन बघा. ही चव कशी विकसित झाली किंवा बदलली हे पाहून कदाचित तुम्हालाच आश्चर्य वाटेल!
वर नमूद केलेल्या काही पद्धतींचा अवलंब करणाऱ्या विशिष्ट पाककृती आता पाहूया. यामध्ये तीव्र चवी व वास आहेत. त्यांचे स्वरूपही निरनिराळे आहे. त्यामध्ये तुमच्या शरीराच्या आणखी एका संवेदनेचा वापर केला जातो. योग्य प्रकारे काम करत असलेल्या संवेदनेचा वापर केला तर अकार्यक्षम झालेल्या बाकी संवेदना पुन्हा मिळवण्यासाठी मदत मिळू शकते.
साहित्य:
कृती:
साहित्य:
कृती:
या पाककृतींमुळे तुमच्या वास व चव या संवेदना जागृत होऊ लागतील, अशी अपेक्षा आहे. वर नमूद केलेले घटक आणि पद्धत वापरून कदाचित तुम्ही स्वतः त्यातून नव्या पाककृती देखील तयार करू शकाल.
(टीप : उपरोक्त लेख हा MT (ASCP), FAAP, FACP, सिरसी हेल्थ प्रा.लि.च्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारीव्यवस्थापकीय संचालक डॉ. जेनिफर प्रभू यांच्या माहितीवर आधारित आहे. डॉ. प्रभू इंटर्नल मेडिसिन आणि पेडिअॅट्रिक्स यामध्ये डबल बोर्ड-सर्टिफाइड डॉक्टरही आहेत.)
(Decreased ability to smell and taste after corona Then try this recipe by Dr Jennifer Prabhu)
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला
बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती यशस्वी, रुग्ण दुसऱ्याच दिवशी घरी, राज्यातील पहिलाच प्रयोग