डास हे जगातील सर्वात घातक किटक (इंसेक्ट्स) आहेत. प्रत्येक वर्षी 10 लाख पेक्षाही अधिक मृत्यू याच डासांच्या डंखातून (From mosquito bites) पसरलेल्या रोगामुळे होतात. त्यात मलेरिया, यलो फिवर, डेंग्यू, झिका आणि चिकनगुनिया या सारख्या आजारांचा समावेश आहे. एकटा डास स्वतः सोबत अनेक विषाणूंचे वहन करण्यास कारणीभूत आहे. जेव्हा एखाद्या माणसाला डास चावतो तेव्हा तो माणूस संक्रमित होतो. याच माध्यमातून विषाणूंचा इतर रुग्णांमध्ये प्रसार होण्यास मदत होते. दरम्यान, अभ्यासकांनी एक नवे संशोधन (New research) मांडले आहे. त्यानुसार डेंग्यू, झिका यासारख्या आजारांनी संक्रमित व्यक्तीच्या शरीराचा गंध बदलतो. त्यामुळे डास मानवी गंधाकडे (To human odor) जास्त आकर्षित होऊ लागले आहे. असा निष्कर्ष अभ्यासात आढळून आले आहेत. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकटच्या इम्युनॉलॉजी डिपार्टमेंटचे सहायक प्राध्यापक पेंगुआ वैंग यांनी या संशोधनाचा दावा केला आहे.
डास वेगवेगळ्या संकेतांनी मानवी शरीराचा शोध घेतात. ज्यात शरीराचे तापमान व श्वास घेतांना कार्बनडाय ऑक्साईडचे विसर्जनाचा समावेश होतो. या व्यतिरिक्त मानवी शरीराचा गंध वेगळी भूमिका बजावते. यापूर्वी प्रयोगावरून असे आढळून आले होते की, मलेरियाने संक्रमित उंदराचा गंध बदलला होता. त्यामुळे अधिक डास त्याच्या दिशेने आकर्षित होऊ लागले. आता अभ्यासकांना असे आढळून आले आहे की, डेंग्यू आणि झिका व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर मानवी शरीराचा गंध बदलला आहे. ज्याच्यामुळे डास त्यांच्या दिशेने अधिक आकर्षित होतात.
वैज्ञानिकांनी याचा खुलासा करण्यासाठी एका चेंबरमध्ये काही उंदीर ठेवले आहेत. त्यात काही उंदीर डेंग्यू आणि झिका व्हायरसने संक्रमित होते. त्यांच्या दिशेने अधिक वेगाने आणि दुपट्टीने डास आकर्षित झाल्याचे पहायला मिळाले. यातून असे आढळून आले की, झिका विषाणुने संक्रमित उंदिरांनी सामान्य उंदरांच्या तुलनेत कमी कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जित केले. त्यावरुन असे निदर्शनास आले की, शरीराची उष्णता सोबतच शरीराचा गंधही मच्छरांना जास्त आवडतात.
प्रयोगाचे निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकांनी एका काचेच्या चेंबरमध्ये एक पडदा लावून उंदिरांच्या शरिराचा गंध डासांपर्यंत पोहचण्यापासून प्रतिबंध केला. यात असे आढळून आले की, संक्रमित आणि विनासंक्रमित उंदिरांकडे सारख्या प्रमाणात डास आकर्षीत झाले. वैज्ञानिकांनी नंतर संक्रमित उंदरामधून उत्सर्जित हेाणाऱ्या 20 वेगवेगळ्या वायुंसह, रसायनांना वेगवेगळे केले. त्यापैकी तीन रासायनिक द्रावण वेगवेगळ्या गटांना लावण्यात आले. यावरुन असे निदर्शनास आले की, उंदिर एसिटोफेन (एसीटोफेनोन)च्या दिशेने अधिक आकर्षित झाले. त्याच प्रमाणे, डेंग्यू संक्रमित रुग्णाच्या काखेतून गंधाचे संकलन करण्यात आले तेव्हा निरोगी व्यक्तीपेक्षा त्याच्यात एसिटोफेन उत्सर्जित झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे डेंग्यू संक्रमित व्यक्तीचा गंधाच्या दिशेने डास अधिक आकर्षित झाले होते.
वैज्ञानिकांच्या मते, या अभ्यासातून असे निष्पन्न झाले आहे की, डेंग्यू आणि झिका व्हायरस मानवी शरिरात एसिटोफेनची मात्रा वाढवतात. जेव्हा असंक्रमित डास संक्रमित व्यक्तीला डंख मारतात तेव्हा ते, इतत्र प्रसाराकरीता पुरक ठरतात.
एसिटोफेन एका प्रकारचे रसायन आहे. जो सामान्यतः सुगंधासाठी वापरला जातो. याशिवाय त्वचेवरील काही जिवाणू(बॅक्टेरिया) मध्येही सापडतो. याशिवाय मनुष्य आणि उंदराच्या आतड्यातही एसिटोफेन तयार होत असतो. घामासोबत त्याचे उत्सर्जन वाढत जाते.
त्याच्यासाठी वैज्ञानिकांनी उंदरावर काही दिवस विटामिन ए च्या गोळ्यांचे डोस निश्चीत केले. काही दिवसांनी संसर्ग झालेले उंदिर आणि असंक्रमित उंदीर अशा दोघांकडेही एकसमान आकर्षित झाले. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात आला की, विटामिन-ए एसिटोफेन उत्सर्जित करणार्या बॅक्टेरियाला नियंत्रणात आणू शकते.