मुंबई: मधुमेह हा अत्यंत गुंतागुंतीचा आजार आहे, एकदा का जर त्याने माणसाला त्याचा बळी बनवलं, तो आयुष्यभर सोडत नाही. जगभरात वैद्यकीय शास्त्राचा बराच विकास झाला आहे, असे असूनही शास्त्रज्ञांना त्यावर कोणताही ठोस इलाज सापडलेला नाही. मात्र संतुलित जीवनशैली आणि निरोगी खाण्यापिण्याच्या सवयीचा अवलंब केल्यास मधुमेहाच्या आजारात आराम मिळू शकतो. जर तुम्ही आरोग्याबाबत बेफिकीर असाल तर उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाचा आजार होण्याचा धोका असतो.
कांद्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात असावी असे वाटत असेल तर आजपासूनच कांद्याचा रस पिण्यास सुरुवात करा. याच्या मदतीने टाइप-१ आणि टाइप-२ अशा दोन्ही रुग्णांना आराम मिळू शकतो. विशेष म्हणजे कांद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे त्याचे पचन मंदावते आणि मग रक्तप्रवाहात हळूहळू साखर बाहेर पडते.
कांदा अनेक प्रकारे खाल्ला जातो, कांदा नसेल तर अनेक पाककृतींची चव बिघडू शकते. कोशिंबीर म्हणून खाणे हा एक अतिशय निरोगी पर्याय असला तरी आपण भाजीत सुद्धा कांदा खाऊ शकता.
कांदा उकळून त्याचा रस प्यायल्यास तो शरीरासाठी डिटॉक्स ड्रिंकचे काम करेल. या घरगुती उपायाने शरीरातील कॅलरीज कमी होण्यास सुरुवात होईल आणि मधुमेहाच्या रुग्णांना बरेच फायदे मिळतील.
त्यासाठी मध्यम आकाराचे २ कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवा आणि मग त्यात १ कप पाणी, चिमूटभर काळे मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. हे प्यायल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि अनेक आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)