मधुमेह (Diabetes)झालेल्या लोकांना, सकाळच्या नाश्त्यात काय खायचे हा एक प्रश्नच पडतो. त्याचे मुख्य कारण आपण साधारणत: जो नाश्ता करतो, त्यामध्ये कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात. जे त्यांच्या प्रकृतीसाठी फायदेशीर नसते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना अशा पदार्थांचा नाश्यात (Breakfast) समावेश करण्यास सांगितला जातो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar level) ठेवेल अथवा कमी करेल. रक्तातील साखर वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक (Harmful health) ठरू शकते. मधुमेह झालेला असल्यास, प्रत्येक जेवणाकडे लक्ष देणे गरजेचे असते. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये बऱ्याच तासांचे अंतर पडते. त्यामुळे सकाळचा नाश्ता चांगला व भरपेट करणे महत्वाचे ठरते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारे काही पदार्थ मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात. जाणून घेऊया, असे कोणते पदार्थ आहेत.
एक प्राचीन धान्य म्हणून कुट्टू ओळखले जाते. इंग्रजीत त्याला Buckwheat असे म्हटले जाते. कुट्टूच्या बिया या धान्य म्हणून वापरल्या जातात. त्यापासून पीठ तयार केले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ग्लुटेन फ्री असे कुट्टूचे पीठ हा नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ज्या व्यक्तींना सकाळी नाश्त्यासाठी पराठे खायची सवय आहे, ते कणकेऐवजी कुट्टूचे पीठ वापरून तयार केलेल्या पराठ्याचे सेवन करू शकतात. याच पीठाच्या पुऱ्या, भजी तसेच पोळीही बनवता येते.
ओटमीलमध्ये कार्ब्सचे प्रमण भरपूर असते, मात्र त्यामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन केले तरी त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.
संडे हो या मंडे.. रोज खाओ अंडे, असे नेहमी म्हटले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अंडी (Eggs) खायला आवडतात आणि नाश्त्यासाठी तो चांगला पर्याय मानला जातो. मधुमेहाबाबतीत बोलायचे झाले तर मधुमेह असलेले रुग्णही अंडी खाऊ शकतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यात उकडलेली अंडी, फ्राय केलेली अंडी, अंडा भुर्जी अथवा भाज्या घालून केलेले ऑम्लेट यांचे सेवन करू शकता.
सकाळी नाश्ता करताना कोरफडीचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. रक्तातील साखर कमी करण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर मानला जातो. कोरफडीची पाने स्वच्छ धुवून, मिक्समधून त्याचा रस काढावा. त्यामध्ये भाजलेल्या जीऱ्याची पावडर, पुदीना आणि मीठ घालून त्याचे सेवन करावे.
(टीप – या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारीत आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)