मधुमेहाने त्रस्त असलेल्यांना विशेषतः साखरयुक्त पेयांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. आधीच मधुमेह असल्याने बाहेरील अन्नघटकांमुळे रक्तातील साखर अजून न वाढावी यासाठी अनेक जण आपल्या जेवनातूनच असे अन्नघटक वर्ज करीत असतात. सोबतच साखरेची पातळी वाढू नये या विचाराने नैसर्गिक गोड फळे (Natural sweet fruit) खाणेही टाळतात. असाच काहीसा गोंधळ नारळ पाण्याबाबतही (Coconut water) कायम असतो. नारळाच्या पाण्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे नारळ पाण्याचे सेवन केले जात नाही. अनेकांना याबाबत शंका (Doubt) असते. जर तुमच्याही मनात शंका असेल की मधुमेहाच्या रुग्णाने नारळ पाणी प्यावे की नाही, तर या लेखातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
हिरव्या नारळापासून काढलेले पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे ज्यामध्ये कॅलरीज नसतात. इलेक्ट्रोलाइट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यांसारखे इतर अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात. नारळाच्या पाण्याची चव गोड लागते पण त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम गोडवा वापरला जात नाही. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होत नाही.
साखर नियंत्रित ठेवण्यास मदत
मधुमेहाच्या रुग्णांवर नारळ पाण्याचा काय परिणाम होतो, याबद्दल मानवांवर कोणतेही विशेष संशोधन झालेले नाही. परंतु प्राण्यांवर केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की नारळ पाणी सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नारळाच्या पाण्यात आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी इत्यादी इंसुलिनचे कार्य सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
मर्यादेत करावे सेवन
‘जर्नल ऑफ मेडिसिनल फूड’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असेही म्हटले आहे, की नारळाचे पाणी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या गोडवा असतो. त्यात ‘फ्रक्टोज’ देखील आहे. त्यामुळे नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन करू नये. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 1 कप (240 मिली) पेक्षा जास्त नारळाचे पाणी पिऊ नये..
नारळ पाण्याचे फायदे
1) नारळ पाण्यामुळे शरीराला ‘हायड्रेट’ ठेवता येते. यामुळे किडनी स्टोनच्या आजारापासून दूर राहू शकता. शरीरातील पाण्याचे संतुलित प्रमाण राखण्यासाठी नारळ पाणी एक चांगला स्रोत आहे.
2) नारळाचे पाणी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करून हृदयविकारापासून वाचवते.
3) नारळ पाण्यात पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. ते रक्तदाब कमी करण्यासही मदत करते.
4) नारळाचे पाणी अँटिऑक्सिडंट ने भरपूर असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते.
संबंधित बातम्या :
त्वचेच्या कोरडेपणापासून ते पुरळांपर्यंत बेसनाचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?