मुंबई: आंबे चविष्ट आणि आरोग्यदायी असतात, हे फळ अनेकांना आवडते. आंब्याचा हंगाम जवळ येत आहे, पण आंबा रसाळ आणि गोड असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना हे त्यांच्यासाठी योग्य फळ आहे का, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तथापि, संशोधनात असे आढळले आहे की मधुमेह असलेले लोक या फळाचे मर्यादित प्रमाणात सेवन करू शकतात. पौष्टिक आकडेवारीनुसार, प्रत्येक आंब्यात (सुमारे 100 ग्रॅम) 15 ग्रॅम कार्ब आणि 14 ग्रॅम साखर असते. त्यामुळे अर्थातच आंब्याचा तुकडा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांचा सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे ते आंबे खाऊ शकतात का? याचे उत्तर होय, पण आंबा मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे. आंब्याचे एक किंवा दोन तुकडे मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगले असू शकतात. आंबा आरोग्यदायी असला तरी इतर फळांप्रमाणे त्यातही कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, परंतु आंब्यातील फायबरचे प्रमाण साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करते. म्हणजेच आंबा खाल्ल्यानंतर वाढलेली रक्तातील साखर नियंत्रित करता येते. शिवाय, आंबा हे चांगले पोषण मूल्य, कमी ग्लाइसेमिक लोड आणि स्वीकार्य ग्लाइसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे, याकडेही शास्त्रज्ञ लक्ष वेधतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)