मधुमेह ही आज सामान्य आरोग्य समस्या बनली आणि त्याला नियंत्रणात ठेवणे हे कुठल्याही आव्हान अपेक्षा कमी नाही. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कमी GI असलेले पदार्थ खावे लागतात. रक्तातील साखरेची पातळी संतुलित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्याचा हृदय,मूत्र पिंड आणि इतर अवयवांवर थेट परिणाम होतो. मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करून त्यावर नियंत्रण मिळवता येते. अशी काही फळे आहेत ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ती फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया अशाच फळांबद्दल जे केवळ स्वादिष्ट नाही तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करतात.
जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान मानले गेले आहे. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. ज्यामुळे ते रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. जांभळाच्या बियांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे गुणधर्म देखील असतात. जांभूळ तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा त्याच्या बिया वाळवून त्याची पावडर बनवून पाण्यासोबत देखील घेऊ शकता.
सफरचंद मध्ये फायबर आणि पेक्टिन नावाचे घटक असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे शरीरातील इन्सुलिनच्या कार्यास देखील प्रोत्साहन देते. एक मध्यम आकाराचे सफरचंद स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता.
नासपती मध्ये उच्च फायबर आणि जीवनसत्वे असतात. जे पचन मंद करून रक्तातील साखरेचे पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. ते सॅलडमध्ये खाणे किंवा डायरेक्ट खाणे देखील फायदेशीर ठरते.
काळया द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यात नैसर्गिक साखर कमी प्रमाणात असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी काळी द्राक्ष फायदेशीर आहेत. तुम्ही दिवसभरात कधीही दहा ते बारा काळी द्राक्ष खाऊ शकतात.
पपई हे एक असे फळ आहे ज्यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त प्रमाणात फायबर असते. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते याशिवाय पचनक्रिया सुधारते. तुम्ही नाश्त्यात पपई खाऊ शकतात किंवा स्मुदी बनवून देखील खाऊ शकता.