शरीरात लोह कमी असेल तर काय होतं? वाचा

| Updated on: Jul 15, 2023 | 4:24 PM

लोहाशिवाय आपलं शरीर कमकुवत होऊ लागतं. त्यामुळे या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ लागतं. रोजच्या आहारात लिंबू, पालक, बीटरूट, पिस्ता, सुक्या मनुका, पेरू, केळी आणि अंजीर यासारख्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणते नुकसान होऊ शकते.

शरीरात लोह कमी असेल तर काय होतं? वाचा
weakness
Follow us on

मुंबई: लोह हे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्वाचे खनिज आहे जे केवळ आपले पोषणच करत नाही तर अनेक आजारांपासून आपले संरक्षण देखील करते. लोहाशिवाय आपलं शरीर कमकुवत होऊ लागतं. त्यामुळे या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ लागतं. रोजच्या आहारात लिंबू, पालक, बीटरूट, पिस्ता, सुक्या मनुका, पेरू, केळी आणि अंजीर यासारख्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणते नुकसान होऊ शकते.

लोहाच्या कमतरतेचे तोटे

ॲनिमिया

लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमियाचा सामना करावा लागू शकतो. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्ताची कमतरता असते, विशेषत: स्त्रियांमध्ये ही समस्या सामान्य आहे. त्यामुळे दररोज काही ना काही गोष्टी खायलाच हव्यात ज्यात भरपूर प्रमाणात लोह असतं.

अशक्तपणा

जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा त्यातून आवश्यक प्रमाणात हिमोग्लोबिन तयार होत नाही, ज्यामुळे तुम्हाला पूर्ण झोप घेऊनही दिवसभर अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील सामान्य क्रिया करणे देखील कठीण होते.

हृदयविकाराचा धोका

हृदयाच्या आरोग्याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे कारण भारतात हृदयाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची कमतरता भासते. यामुळे शरीराच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही, ज्यामुळे हृदयाचे काम वाढते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

केस आणि त्वचेचे आजार

केस आणि त्वचेचे आजार. लोह आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. जर या पोषक तत्वाची कमतरता असेल तर त्वचा आणि केसांच्या समस्या सुरू होतात. जसे की त्वचेवर कोरडेपणा, डाग पडणे, त्वचेचा रंग कमी होणे किंवा त्याची निर्जीवता. याशिवाय केस गळणे आणि कोंडा होण्याची ही समस्या असते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)