जास्त झोपल्यावर काय होतं? वाचा

| Updated on: Jul 16, 2023 | 3:49 PM

पहिलं म्हणजे पूर्ण झोप न येणं आणि दुसरं म्हणजे जास्त झोप घेणं. या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत कारण यामुळे आपल्या शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. कमी झोपणे आणि जास्त झोपणे दोन्ही हानिकारक आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

जास्त झोपल्यावर काय होतं? वाचा
Sleep schedule
Follow us on

मुंबई: चांगल्या आरोग्यासाठी योग्य झोप खूप महत्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, झोपेशी संबंधित समस्या सहसा 2 प्रकारच्या असतात. पहिलं म्हणजे पूर्ण झोप न येणं आणि दुसरं म्हणजे जास्त झोप घेणं. या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत कारण यामुळे आपल्या शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. कमी झोपणे आणि जास्त झोपणे दोन्ही हानिकारक आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

आपण एका दिवसात किती झोप घ्यावी?

जगभरात झालेल्या संशोधनानुसार निरोगी प्रौढ व्यक्तीने रात्रभर किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे, तरच त्यांच्या शरीराची कार्ये व्यवस्थित काम करतील आणि समस्या उद्भवणार नाहीत.

जर तुम्हाला रात्रीच्या वेळेत नीट झोप येत नसेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी स्पष्टपणे दिसून येतो. यामुळे थकवा, सुस्ती, शरीर बिघडणे, ऊर्जेची कमतरता होऊ शकते. कमी झोपेमुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका असू शकतो, असा दावाही अनेक आरोग्य तज्ज्ञ करतात.

आपल्या झोपेची वेळ निश्चित करा आणि वेळ, शेड्युल बदलण्याचा प्रयत्न करू नका. गरजेपेक्षा जास्त झोप घेतली किंवा आळशीपणामुळे शरीराचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

नार्कोलेप्सी

हा एक विचित्र झोपेचा विकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दिवसा जास्त झोप येऊ लागते किंवा अचानक झोप येते. प्रवास करताना हा आजार धोकादायक ठरतो.

स्लीप एपनियाचा

यात श्वासोच्छवासावर वाईट परिणाम होतो आणि नियमित श्वासोच्छ्वास थांबतो. त्यामुळे आवश्यक तेवढी झोप घ्यावी.

इडिओपॅथिक हायपर सोम्निया

जे लोक इडिओपॅथिक हायपरसोम्नियाने त्रस्त असतात त्यांना दैनंदिन जीवनातील सामान्य क्रिया करताना खूप थकवा जाणवतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)