मुंबई: खाण्यापिण्याचे विकार आणि खराब जीवनशैलीने आजकाल प्रत्येक चौथ्या व्यक्तीला ग्रासले आहे. अशा जीवनशैलीमुळे लोकांची रात्रीची झोप नाहीशी झालीये. लोकं चांगली झोप लागावी म्हणून खूप प्रयत्न करतात. पण खरं तर हे सगळं एखाद्या व्यक्तीच्या खाण्यापिण्यावर असतं. कुठल्याही वेळी काहीही खाल्ल्याने त्याचा परिणाम झोपेवर होतो, असे आरोग्य तज्ञ सांगतात. ही समस्या टाळण्यासाठी रात्री काही गोष्टी खाणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जाणून घेऊयात सविस्तर…
जर तुम्हाला रात्री निवांत झोप घ्यायची असेल तर झोपण्याच्या 3 तास आधी चहा-कॉफीचे सेवन करू नका. या दोन्ही गोष्टींमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे गॅस-ॲसिडिटी तयार होते. या गोष्टी टाळल्याने तुमचं पोट तंदुरुस्त राहू लागेल.
जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची अनेकांना सवय असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक जण चॉकलेट खातात. रात्री चॉकलेट खाल्ल्याने ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतो. ज्यामुळे पोटदुखी आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
रात्री निवांत झोप घेण्यासाठी आपण रात्री भजी खाऊ नयेत. या भज्यांमध्ये तेल असते, ज्यामुळे ते आम्लयुक्त बनतात. रात्री शरीराला ही भजी पचवणेही अवघड असते, त्यामुळे ते टाळणेच योग्य ठरेल.
आजकाल रात्री पिझ्झा पार्ट्यांचा ट्रेंडही सुरू आहे, पण असा छंद आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. पिझ्झामध्ये जास्त फॅट असते आणि ते सहज पचत नाही. अशावेळी रात्री खाल्ल्याने ॲसिडिटी होण्यास वेळ लागत नाही.
आरोग्य तज्ञांच्या मते, रात्री लिंबू, संत्री, टोमॅटो आणि बेरी सारख्या आंबट पदार्थांचे सेवन करून झोपू नये. या सर्व गोष्टींमुळे शरीरातील ॲसिडची पातळी वाढते, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवते. यामुळे रात्री छातीत जळजळ होण्याची समस्याही वाढते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)