Health Tips | मायक्रोवेव्ह वापरताना ‘अलर्ट’; ‘या’ गोष्टी टाळा, आरोग्य सांभाळा

| Updated on: Dec 16, 2021 | 7:58 PM

मायक्रोवेव्हमधून आधुनिक ‘धग’ मिळत असली तरी फायद्यासोबत त्याचे तोटेही लक्षात घेणं महत्वाचे ठरते. प्रत्येक पदार्थाला मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याचे टाळायला हवे. पदार्थातील पोषकतत्वे त्यामुळे संपुष्टात येतात.

Health Tips | मायक्रोवेव्ह वापरताना ‘अलर्ट’; ‘या’ गोष्टी टाळा, आरोग्य सांभाळा
मायक्रोवेव्हची वापरताना ‘अलर्ट’
Follow us on

मुंबई : अन्नपदार्थांच्या निर्मितीसाठीच्या साधनांमध्ये चूल ते मायक्रोवेव्ह असे स्थित्यंतर दिसून आले. आजकाल स्वयंपाकघरातील महत्वाच्या उपकरणांत मायक्रोवेव्हचा समावेश हमखास होतो. काही वर्षांपूर्वी अभावाने आढळणारा मायक्रोवेव्ह स्वयंपाकघरात गरजेचे साधन बनला आहे. कमी वेळात ताजे अन्न शिजविण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. निकडीच्या वेळेत मायक्रोवेव्ह नक्कीच मदतीचा हात पुढे करणार हे निश्चित. त्यामुळे केवळ घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही पदार्थ बनविण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी हमखासपणे मायक्रोवेव्हचा उपयोग केला जातो.

मायक्रोवेव्हमधून आधुनिक ‘धग’ मिळत असली तरी फायद्यासोबत त्याचे तोटेही लक्षात घेणं महत्वाचे ठरते. प्रत्येक पदार्थाला मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याचे टाळायला हवे. पदार्थातील पोषकतत्वे त्यामुळे संपुष्टात येतात.

मशरुम (Mushroom)

मायक्रोवेव्हमध्ये मशरुम गरम केल्याने त्याचे पोषकतत्व नष्ट होते. त्यामुळे मशरुम पासून मिळणारी पोषखतत्वे शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे मशरुम बनविल्यानंतरच खाण्यास प्राधान्य द्यायला हवं. मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या मशरुममुळे तुमच्या शरीराचे पचनतंत्र बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भात (Rice)

सर्वसाधारणपणे जेवणात भाताचा समावेश असतोच. मात्र, मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या भाताचा जेवणात समावेश केल्यामुळे अन्नातून होणाऱ्या विषबाधेला सामोरे जावे लागते. उलट, मळमळ यांसारखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात.

चिकन (Chicken)

चिकन मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यामुळे त्याच्या प्रथिन संरचनेत मोठा बदल होतो. अशाप्रकारचे चिकन सेवन केल्यामुळे तुमच्या पचनतंत्रावर निश्तितच परिणाम होऊ शकेल. तुम्ही जर मायक्रोवेव्हचा वापर करुन चिकन गरम करत असल्यास तुम्हाला सवय आजपासूनच बदलावी लागेल.

तेल (Oil)

कोणत्याही प्रकारचे खाद्यतेल मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये. त्यामुळे तेलामधील उपयुक्त फॅटचे रुपांतर अनउपयुक्त फॅक्टमध्ये दिसून येते. अशाप्रकारचे तेलाचा आहारात उपयोग करणे तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते.

अंडा(Egg)

तुम्ही मायक्रोवेव्हद्वारे अंडे उकळत असल्यास त्याचे परिणाम जाणून घ्या. मायक्रोवेव्हमध्ये अंडे उकळल्यामुळे त्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे अंडे खाण्यायोग्य राहत नाही तसेच अंड्याचे पोषक तत्व नाहीशे होते.

इतर बातम्या

नवीन वर्षांच्या स्वागताचा प्लॅन काय? समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर या टिप्स नक्की वाचा

काय तुमचं डोकं दुखत आहे, मग आम्ही आहोत ना