मुंबई- देशात मंकीपॉ़क्सचे (Monkey Pox)चार रुग्ण सापडल्यानंतर, आता या व्हायरसबाबत (virus) नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. अनेक जण सध्या मंकीपॉक्सवर असलेल्या लशींची (vaccine)आणि औषधांची माहिती घेत आहेत. आत्तापर्यंत कुठलेही ऑलिपॉथीचे औषध मंकीपॉक्स आजारासाठी योग्य असल्याचे समोर आलेले नाही. मा्त्र याच काळात आयुर्वैदिक डॉक्टरांचा दावा आहे की, आयुर्वेदातील काही औषधांच्या सेवनाने या व्हायरसचा प्रभाव कमी होण्याची दाट शक्यता आहे. ही औषधे कोणती आहेत आणि या व्हायरसपासून कसा ते बचाव करु शकतील हे जामून घेऊयात. आयुर्वेदात कोणत्याही आजारावर उपचार हा वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन करुन करण्यात येतो. मंकीपॉक्स हा संक्रमण करणारा आजार आहे. वात आणि पित्ताच्या गडबडीमुळे हे घडते. अशा स्थितीत सध्या वात आणि पित्तकारक पदार्थांचे सेवन करण्यापासून स्वताला रोखायला हवे, असे आयुर्वेदाचे डॉक्टर सांगत आहेत. असे सेवन थांबवल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकणार नाही.
मंकीपॉक्सच्य आजारात एन्टीव्हायरल कंदमुळांचं सेवन केल्यास याचे संक्रमण कमी करता येणे शक्य आहे. यासाठी बिडंग, कालगेम, चित्तक आवळा, पपईच्या पानांचा रस, भृंगराज, कुटकी, जय मंगल रस, पंचतीघृत रस, महामृत्युंजय रस, पूनर्लोवा यांचे सेवन करण्यात येईल. या कंदमुळांना आणि औषधांचा वापर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
मंकीपॉक्स झाल्यानंतर शरिरावर पुरळ उठते, पुळ्या होतात. त्यानंतर त्या वाळतात आणि त्वचेला खपली धरते. हे रोखण्यासाठी रुग्णांनी लिंबाच्या पानांचा रस, लिंबाचे साल त्वचेवर लावावे, त्वचेवर असलेले किटाणू मारण्यासाठी आणि संक्रमण रोखण्यासाठी लिंबाचा चांगला उपयोग होऊ शकतो.
जर एखाद्या संशयितात मंकीप़क्सची लक्षणे असतील तर त्याने काही पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य करावे. थंड पदार्थ खाण्यापासून या रुग्णाला रोखावे. अशा स्थितीत कोबी, भात, दही, कढी, मुळा खाऊ नये. आंबट पदार्थही खाऊ नयेत. तसेच मीठयुक्त पदार्थ आणि लोणचं खाल्ल्यास संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचे सेवन केल्यास शरिरात वात आणि पित्त तयार होते.
मंकीपॉक्सपासून वाचण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसेच हायजीनकडे लक्ष ठेवावे. असे केल्यास मंकीपॉक्सचा व्हारस संक्रमणाचा धोका कमी होण्याची दाट शक्यता आहे.