Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 4 सोपे व्यायाम तुम्ही नियमित करू शकता!

| Updated on: Sep 01, 2021 | 8:27 AM

निरोगी राहण्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतो, परंतु आपले संपूर्ण आरोग्य आणि वजन राखण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे देखील आवश्यक आहे. आपल्या एकूण आरोग्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हे 4 सोपे व्यायाम तुम्ही नियमित करू शकता!
व्यायाम
Follow us on

मुंबई : निरोगी राहण्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतो, परंतु आपले संपूर्ण आरोग्य आणि वजन राखण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे देखील आवश्यक आहे. आपल्या एकूण आरोग्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा तुम्हाला निरोगी पदार्थ आणि खराब जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Do these 4 simple exercises to lose weight)

बऱ्याचदा लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना बाहेर जाऊन व्यायामशाळेत जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. या समस्येचा सामना करण्यासाठी आपण अशा काही व्यायामांचा सराव करू शकता. जे तुम्ही घरी आरामात करू शकता. चला जाणून घेऊया कोणते 5 व्यायाम तुम्ही घरी करू शकता.

चालणे/धावणे – धावणे, चालणे किंवा वेगाने चालणे हे वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कॅलरी बर्न करण्याचा वेगवान मार्ग म्हणजे जलद चालणे. ही शारीरिक क्रिया आपल्या दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट करणे सोपे आहे. तुम्ही तुमचे काम संपल्यावर किंवा रात्रीचे जेवण केल्यानंतर संध्याकाळी फिरायला जाऊ शकता. रात्रीच्या जेवणानंतर चालणे हे वजन कमी करण्याच्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.

स्किपिंग – स्किपिंग ही संपूर्ण शरीराची कसरत आहे. जी स्नायू तयार करण्यास मदत करते. हे चयापचय वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते. आपण हे घरी करू शकता, अगदी आपल्या बेडरूमवर देखील. या स्किपिंग व्यायामामुळे तुमच्या हृदयाचा ठोका वाढतो, ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण जलद होते. यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.

पुश अप – हे सर्वात लोकप्रिय व्यायामांपैकी एक आहे. कारण ते कुठेही, कधीही आणि प्रत्येकाद्वारे केले जाऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी पुश-अप हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे कॅलरीज बर्न होतात. विशेष म्हणजे आपण पुश अप कुढेही करू शकतो. त्यासाठी आपल्याला वेगळ्या कुढल्याही साहित्याची गरज लागत नाही.

स्क्वॅट – स्क्वॅट हा एक लोकप्रिय व्यायाम आहे. जो स्नायूंना बळकट करण्यास मदत करतो. स्क्वॅट्स तुमचे शरीर मजबूत करतात तसेच कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. या व्यायामामुळे आपल्या कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do these 4 simple exercises to lose weight)