तुम्हालाही तुमच्या ‘युरीन’ मध्ये पांढरे कण दिसतात का? मग तुम्हाला ‘हे’ आजार असू शकतात; जाणून घ्या, काय आहेत कारणे आणि त्यावरील उपचार!

| Updated on: Jun 13, 2022 | 5:59 PM

मुत्रविसर्जनातून आम्हाला पांढरे कण दिसतात अशा तक्रारी घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येतात. बहुतांश प्रकरणात ते, अजिबात धोकादायक ठरत नाही. परंतु कधी-कधी आपल्याला यामुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

तुम्हालाही तुमच्या ‘युरीन’ मध्ये पांढरे कण दिसतात का? मग तुम्हाला ‘हे’ आजार असू शकतात; जाणून घ्या, काय आहेत कारणे आणि त्यावरील उपचार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

सामान्यतः युरिनचा रंग (The color of the urine) हलका पिवळा असतो आणि त्यात कोणत्याही प्रकारचे खडे किंवा कण दिसत नाहीत. परंतु काही प्रकरणांमध्ये, जसे की गर्भधारणा, मुत्रमार्ग संसर्ग किंवा किडनी स्टोन (Kidney stone) आदींमुळे लघवीतून पांढरे कण जातात, ज्यांच्या मुळे लघवी गढूळ होते. गर्भधारणा आणि मूत्रमार्गाचा संसर्ग या लघवीचा रंग बदलण्याची सामान्य कारणे सांगता येतील. परंतु अशी लक्षणे दिसतात तेव्हा इतर रोग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीच्या हार्मोन्समध्ये (In female hormones) अनेक बदल होतो, ज्यामुळे योनीतून स्त्राव झाल्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. शरीरातून बाहेर पडतांना ते मुत्रमार्गाद्वारे लघवीत मिसळल्याने पांढरे कण दिसतात. जर, तुम्ही गर्भवती असाल तर काही काळजी करण्याचे कारण नाही. हि, सामान्य बाब आहे. जर, तुम्हाला खाज सुटणे, जळजळ आणि स्त्राव गडद होण्याची चिन्हे दिसली तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

यूटीआय

(युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन) मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लघवीतून पांढरे कण दिसणे सामान्य आहे. जेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गाद्वारे मूत्राशय, मूत्रपिंड किंवा योनीमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते तेथे पोहोचतात आणि आणखी वाढतात. यानंतर ते संसर्ग पसरवतात, यालाच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतात. महिलांसह पुरुषांनाही मूत्रमार्गाच्या संसर्गाचा सामना करावा लागतो आणि मूत्रात पांढरे कण देखील आढळू शकतात.

ओव्हुलेशन

काही स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या वेळी योनीतून पांढर्‍या रंगाचा चिकट पदार्थ भरपूर प्रमाणात तयार होतात. त्याचा रंग पांढरुका असू शकतो. कधी कधी हा चिकट पदार्थ लघवीसोबत बाहेर पडतो. अशा
स्थितीत या चिकट पदार्थाचा उग्र वास येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

किडनी स्टोन

जेव्हा शरीरात यूरिक ऍसिड किंवा कॅल्शियम ऑक्सलेट सारख्या काही पदार्थांची पातळी खूप वाढते तेव्हा किडनी स्टोन होतो. या दोन्ही गोष्टींचे प्रमाण जास्त असल्याने ते मूत्रमार्गात जमा होतात जे नंतर
किडनी स्टोनमध्ये बदलू शकतात. जेव्हा खड्यांचा आकार लहान असतो, तेव्हा तो लघवीसह शरीरातून सहज बाहेर जातो जे पांढरे कण म्हणून दिसू शकतात.

प्रोस्टेटायटीस

प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणार्‍या जळजळांना प्रोस्टेटायटिस म्हणतात. हे सहसा बॅक्टेरियामुळे होते. त्यामुळे लघवी करताना त्यात पांढरे कणही दिसतात.

यीस्ट इन्फेक्शन

यीस्ट इन्फेक्शनमुळे लघवीमध्ये पांढरे कणही येऊ शकतात. Candida albicans नावाची बुरशी निरोगी शरीरात नैसर्गिकरित्या आढळून येते, परंतु अपवादात्मक परिस्थितींमध्ये, ती योनीमध्ये वेगाने वाढू शकते आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकते. या संसर्गाचा परिणाम बहुतेकदा गडद पांढरा स्त्राव होतो. हा स्त्राव मूत्रात मिसळू शकतो आणि पांढरे कण दिसू शकतात.