नवी दिल्ली: जगभरात दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरचे ( स्तनाचा कर्करोग) (breast cancer) रुग्ण वाढत आहेत. या कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यूही (death) होतो. या कॅन्सरची बहुतेक प्रकरणे ॲडव्हान्स स्टेजमध्ये रिपोर्ट (नोंदवली) जातात. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या जीवघेण्या आजाराची लक्षणे आणि बचाव करण्याचे उपाय महिलांना माहीत नसतात. मात्र वेळीच लक्षणे ओळखणे आणि दररोज व्यायाम करणे या उपायांनी हा कॅन्सर टाळता येतो. हा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे, त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की दररोज व्यायाम (daily exercise) केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो.
ज्या महिला शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करत नाहीत, त्यांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो असे ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासात 1.3 लाख महिलांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी 70 हजार महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा ट्युमर पसरला होता, तर अन्य महिलांमध्ये तो पसरला नव्हता. या सर्व महिला व्यायाम करतात की नाही, त्यांची जीवनशैली कशी आहे, याची माहिती या अभ्यासात घेण्यात आली होती.
या संशोधनाच्या निष्कर्षावरून असे दिसून आले की, ज्या स्त्रिया जास्त व्यायाम करतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका ४० टक्के कमी असतो. त्याचबरोबर ज्या महिलाॲक्टिव्ह नसतात आणि ज्यांना बराच वेळ एका जागी बसून काम करावं लागतं, अशा स्त्रियांमध्ये कर्करोगाचा धोका अनेक पटींनी असतो. त्यांना ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर होण्याचा धोकाही सर्वाधिक असतो.
हा कर्करोग स्तनाच्या कर्करोगाचा आणखी एक जीवघेणा प्रकार आहे, ज्यात मृत्यूचा सर्वाधिक धोका असतो. ज्या महिला सक्रिय नसतात त्यांनाही कर्करोगाची लक्षणे अधिक असतात. लठ्ठपणाची समस्या असल्यास ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनुराग कुमार यांनी स्पष्ट केले की, कर्करोग आणि व्यायाम यांचा संबंध आहे. जर एखादी स्त्री अथवा पुरुष सक्रिय जीवनशैलीचे अनुसरण करत असेल तर त्यांना कॅन्सरचा धोका कमी असतो. जे लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात त्यांना व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते.
यापूर्वीही, मेटा-विश्लेषणात असे दिसून आले होते की ज्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग झाला आहे आणित्या नियमितपणे कोणताही व्यायाम करतात, त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. स्तनाच्या कर्करोगाव्यतिरिक्त, शरीराच्या इतर कर्करोगांवर कोलन कर्करोगा बाबत देखील हे लागू होते.