नवी दिल्ली: आजकाल उच्च रक्तदाबाची (high blood pressure) समस्या ही लोकांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. हे दुर्दैवी असले तरी तेच सत्य आहे. हाय ब्लडप्रेशरमुळे आजकाल दर तिसरी व्यक्ती त्रस्त असते. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना हाय बीपीचा त्रास जाणवतो. मुख्य म्हणजे हाय प्लड प्रेशरचा त्रास हा कोणत्याही वयात होऊ शकतो. मोठ्या वयात उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास त्यामुळे हृदयरोगाला चालना मिळू शकते. रक्तदाब नियंत्रित (control) करण्यासाठी बऱ्याचदा पोषक आणि चौरस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पाण्याच्या (drinking water)सेवनानेही ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवता येत हे सांगितले तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. पाणी प्यायल्याने आणि हायड्रेटेड राहिल्यानेही उच्च रक्तदाब कमी करता येतो. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणही योग्य पद्धतीने होते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी किती प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे, ते जाणून घेऊया.
आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिहायड्रेशन आणि रक्तदाब यांचा परस्परसंबंध आहे. आपण जेव्हा योग्य प्रमाणात पाणी पितो, तेव्हा आपले शरीर हायड्रेटेड राहते. शरीर हायड्रेटेड राहिल्याने आपले हृदय त्याचे काम अतिशय योग्य प्रकारे करू शकते. यामुळे आपले रक्ताभिसरणही योग्य पद्धतीने होते. मात्र डिहायड्रेशन झाले तर आपल्या हृदयाला पंप करण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करावे लागतात.
व्हेरीवेल हेल्थ च्या रिपोर्टनुसार, महिलांना रोज 11 कप म्हणजेच 2.7 लीटर पाणी प्यायले पाहिजे. पुरुषांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांनी रोज 15 कप म्हणजे अंदाजे 3.7 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. काही फळं आणि भाज्या यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यांचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.
कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. एका संशोधनात असे आढळले की पाण्यामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मिसळून प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही पाण्यात पुदीना, काकडी, लिंबू किंवा जांभूळ (रस) मिसळून पिऊ शकता.
(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)