लवकर वजन कमी केल्याने शरीराचे नुकसान होते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

| Updated on: Jan 13, 2025 | 10:44 AM

काही लोक त्यांच्या आहारात कार्बोहायड्रेट आणि फॅट्स टाळून लवकर वजन कमी करतात पण काही दिवसातच वजन कमी करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहेत का? काही दिवसातच वजन कमी करण्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकतात ते जाणून घेऊ.

लवकर वजन कमी केल्याने शरीराचे नुकसान होते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Weight Control
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वजन कमी करणे काही सोपे काम नाही त्यासाठी अनेक महिने लागू शकतात. आजकाल इंटरनेटच्या जमाण्यात लोक काही दिवसातच वजन कमी करण्याचे ठरवतात. कोणतेही कष्ट न करता आपले वजन लवकर कमी व्हावे अशीही अनेकांचे इच्छा असते. पण लवकर वजन कमी करण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे त्यांना माहिती नसते. आहार तज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की कमी वेळात जास्त वजन कमी केल्याने आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. अर्थातच वजन कमी करणे हा निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकतो परंतु काही दिवसातच वजन कमी केल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते.

पोषणाची कमी

जेव्हा लोक काही दिवसातच वजन कमी करतात तेव्हा ते कमी कॅलरी आहारात घेतात. अशा आहारात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरची कमतरता असू शकते. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळत नाही. यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवतो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो.

स्नायूंवर परिणाम होतो

स्नायू कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. जेव्हा आपण वजन कमी दिवसातच कमी करतो. तेव्हा केवळ चरबीच नाहीतर शरीराच्या स्नायूंवरही विपरीत परिणाम होतो. हे चयापचयाचे देखील नुकसान करतात.

हार्मोनल असंतुलन

लवकर वजन कमी केल्याने शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते. हार्मोनल असंतुलन विशेषतः महिलांमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. हार्मोनल असंतुलन मानसिक स्थितीवर देखील परिणाम करू शकते. यामुळे तणाव आणि चिडचिड सारख्या समस्या उद्भवू शकतात.

थकवा आणि अशक्तपणा

पोषक तत्वांचा अभाव असलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे व्यक्तीला चक्कर येणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो. अति आळस आणि अशक्तपणामुळे दैनंदिन कामे ही कठीण होऊ लागतात.

या सर्व दुष्परिणामांमुळेच लवकर वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. वजन कमी करण्याच्या प्रवासाला थोडा वेळ द्या. जेणेकरून आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. तुमच्या आहारात प्रथिने आणि फायबरचे पुरेसे प्रमाण ठेवा.