मुंबई : कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढल्याने शरीराच्या अनेक समस्या झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयविकाराचा धोकाही वाढतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही काही खास गोष्टींचा आहारामध्ये (Diet) समावेश करणे खूप आवश्यक आहे. नाहीतर एकदा खराब कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढण्यास सुरूवात झाली तर हृदयविकाराची शक्यता अधिक असते. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये काय घेतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जर आपण सतत बाहेरील फास्टफूड खाण्यावर भर देत असू तर आपल्या शरीरामधून कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढेल. तसेच कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी आपण तेलकट आणि तूपकट पदार्थांचे (Food) देखील सेवन करणे टाळायलाच हवे.
ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक आहे, अशांनी अजिबात चिकन खाऊ नये. आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत, जे दिवसांतून किमान एकदातरी चिकनचे सेवन करतात. मात्र, जास्त प्रमाणात चिकन खाल्याने कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. चिकनच्या अतिसेवनामुळे तुमच्या आरोग्याला अनेक आजार होऊ शकतात.
जे लोक भरपूर मांसाचे सेवन करतात, त्यांना त्यापासून दूर राहावे लागेल, अन्यथा तुमची समस्या वाढू शकते. मांस खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. अशा परिस्थितीत जेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढते, तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. यामुळे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
टोमॅटोमध्ये चांगल्या प्रमाणात लाइकोपीन असते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे पेशींचे नुकसान होण्यापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. टोमॅटो लाइकोपीनचे प्रमाण वाढते. यात नियासिन आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे फायबर असतात. अभ्यासानुसार 2 महिने टोमॅटो खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. यामुळेच आपण आपल्या आहारामध्ये टोमॅटोचा रस नक्कीच घ्यायला हवा.