Marathi News Health Don't overlook the fact that carelessness can be fatal when using a gas geyser keep those thing in your mind
सावधान…! गॅस गिझर वापरताना हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो, या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!
गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुणे आणि नाशिक येथील घटना तर ताज्याच आहेत. बाजारात अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक व गॅस गिझर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या गॅस गिझरची मागणी अधिक आहे. गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत.
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुणे आणि नाशिक येथील घटना तर ताज्याच आहेत. बाजारात अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक व गॅस गिझर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या गॅस गिझरची मागणी अधिक आहे. गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. आज आपण जाणून घेऊयात, गॅस गिझर वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी.
2 / 5
गॅस गिझर हा इलेक्ट्रिक गिझरपेक्षा वेगळा असतो. ते LPG वर चालते आणि पाणी गरम करतो. टाकीच्या तळाशी एक बर्नर असते. मात्र गरम पाणी पाईपद्वारे पोहोचते. इलेक्ट्रिक गिझरपेक्षा गॅस गिझर स्वस्त देखील असतो. हे वापरण्यास देखील खूप सोपा आहे. याच कारणामुळे बरेच लोक गॅस गिझर खरेदी करतात.
3 / 5
तुम्हीही गॅस गिझर वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. बंदिस्त जागेत जसे की, बाथरूम, स्वयंपाकघर असा ठिकाणी गॅस गिझर कधीही लावू नका. जर व्हेंटिलेटर बाथरूम किंवा स्वयंपाकघर सारख्या ठिकाणी असेल तर ते नेहमी उघडे ठेवा. गॅस गिझरची वेळोवेळी तपासणी करा. गळती किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते.
4 / 5
दिवसभर गॅस गिझर वापरणे योग्य नाही. निष्काळजीपणे वापर केल्यास धोका निर्माण होतो. गॅस गिझरमुळे कोणाला समस्या आल्यास, शक्य तितक्या लवकर मोकळ्या जागेत जा. जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही. बाथरूममध्ये आंघोळ सुरू करण्यापूर्वी गॅस गिझर बंद करा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
5 / 5
गॅस गिझरमध्ये गळती झाल्यास त्यातून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलट्या, थकवा आणि पोटदुखी होऊ शकते. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे या यासारख्या समस्या देखील निर्माण होतात. आंघोळ करताना किंवा नंतर अशी कोणतीही समस्या तुम्हाला दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा.