मुंबई: ब्रिटनसह जगातील काही देशात नव्या कोरोना विषाणूचा कहर निर्माण झाल्याने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. या नव्या कोरोना विषाणूवरची लस आली तरी सर्वांना संपूर्ण 2021 पर्यंत मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं सुरूच ठेवावं लागणार असल्याचं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्पष्ट केलं. (Dr Sanjay Oak reaction on new coronavirus strain)
ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली असून अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसह अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. संजय ओक यांनीही अत्यंत महत्त्वाची माहिती देतानाच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रारंभ हा लंडनमध्ये झालेला आहे. इंग्लंडमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या केसेस आपल्याला ऐकायला मिळत आहेत. म्हणजे संख्यात्मक विचार केला तर एका दिवसांमध्ये जवळजवळ 32 हजार नवे रुग्ण आढळून येत असून ही लक्षणीय बाब होती. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याचा जो संभव आहे, त्याची या उपप्रकारामध्ये 70% ॲक्टिव्हिटी अधिक आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली असून त्यासाठीच सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असं डॉ. ओक यांनी सांगितलं.
नोमिप मॅपिंगवरून येणार अंदाज
या नव्या कोरोनाला जिनोमिक मार्किंग असं म्हणतात. वैद्यकीय भाषेत त्याच्या जनुकीय रचनेत स्ट्रेन-वन आणि स्ट्रेन-टूमध्ये फार फरक नसेल. एखादं जनुकं एमआरएमने बदलल्यामुळे हा उपप्रकार तयार झाला. हा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे? त्याच्या किती केसेस आहेत? याचा अभ्यास करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा किंवा पुण्याच्या एनआयव्हीमध्ये होत असलेल्या नोमिक मॉपिंगवरून कळून येणार आहे. या नव्या कोरोनाच्या टाईप वन आणि टाईप टूमध्ये किती केसेस आहेत हे सुद्धा कळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
लसीकरणावर फरक पडणार नाही
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू होणार आहे. ज्या चार प्रकारच्या व्हॅक्सिन आपल्याला मिळणार आहे, त्याचं वितरण व्यवस्थित करून ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रकारचा कोरोना आपल्याकडे आला तर लसीकरणावर त्याचा फार फरक पडणार नाही, असं मला वाटतं. विषाणू जसजसा इन्व्हॉल्व होईल तसतशी व्हॅक्सीन सुद्धा इन्व्हॉल्व होऊन जाईल. त्यामुळे लसीमध्येही फरक पडेल, असं सांगतानाच पण संपूर्ण 2021च्या पर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क लावणं या गोष्टी सुरूच ठेवाव्या लागतील, असं ओक म्हणाले. (Dr Sanjay Oak reaction on new coronavirus strain)
Special Report | ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे नवं रुप, बदलत्या रुपामुळं जग चिंतेतhttps://t.co/tARA8x4of8#coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
संबंधित बातम्या:
अँटीबायोटिक्सचा अतिवापर करताय? थांबा, गंभीर आजाराची शक्यता, वाचा WHO चा इशारा
कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!
ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा कहर; मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात संशोधन सुरू
(Dr Sanjay Oak reaction on new coronavirus strain)