Health | मधुमेह नियंत्रित करण्यासाठी या गोष्टी दुधात मिसळून प्या आणि निरोगी जीवन जगा!

| Updated on: May 01, 2022 | 1:49 PM

औषधी गुणधर्म असलेली हळद प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हळदीमध्ये रोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते.

Health | मधुमेह नियंत्रित करण्यासाठी या गोष्टी दुधात मिसळून प्या आणि निरोगी जीवन जगा!
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मधुमेह (Diabetes) हा अशा आजारांपैकी एक आहे, जो माणसाच्या डोक्याचा ताण चांगलाच वाढवतो. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, जवळपास 90 टक्के लोकांना मधुमेह कधीपासून झाला आहे हे माहीत होत नाही. मधुमेह होण्यामागे अनेक कारणे देखील आहेत. त्यात प्रामुख्याने चुकीचे खाणे, चुकीची जीवनशैली (Lifestyle) आणि अनुवांशिक कारणे देखील आहेत. याचा शरीरावर दोन प्रकारे परिणाम होतो, काही लोकांच्या रक्तातील साखर जास्त राहते, तर काहींची कमी होते. बहुतेक प्रकरणांमध्ये रक्तातील साखरेची (Blood sugar) पातळी वाढल्याने समस्या निर्माण होतात. मधुमेहामुळे शरीरात इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये अडचण येते, भूक न लागणे, जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे यासारखे बदल शरीरामध्ये प्रामुख्याने जाणवतात.

दालचिनी

छोटीशी दालचिनी देखील मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. किचनमध्ये नेहमी असणारी दालचिनी आरोग्यासाठी चांगली मानली जाते. मसाल्याच्या रूपात जेवणाची चव वाढवणाऱ्या दालचिनीमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही दररोज दुधात दालचिनी पावडर टाकून पिऊ शकता. यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास नक्कीच मदत होते.

हळद

औषधी गुणधर्म असलेली हळद प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हळदीमध्ये रोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ती प्रभावी मानली जाते. केवळ मधुमेही रुग्णच नाही तर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे.

बदाम

बदामाचे नियमित सेवन केल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. विशेष म्हणजे सोडियमचे प्रमाण कमी असल्याने उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर मानले जाते, दररोज बदामाचे दूध प्यावे. यासोबतच 6 ते 7 भिजवलेले बदामही सकाळी खावेत. तसेच बदाम फक्त मधुमेहावर नियंत्रणच ठेवत नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष करून आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जर आपल्याला कायमच निरोगी राहिचे असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी बदामाचे सेवन नक्कीच करायला हवे.