ताप आणि अंगदुखीमध्ये डॉक्टरकडे न जाता एका पेरासिटामोलची गोळी (paracetamol tablet) घेऊन अनेकांना बरं वाटतं. अगदी डॉक्टरसुद्धा डोकेदुखी, दातदुखी, सर्दी किंवा फ्लूमध्येही पेरासिटामोलची गोळी घेण्याचा सल्ला देतात. मात्र जास्त तापात या गोळीचा फायदा होत नाही. तर गोळ्या या पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेतल्या जातात. गरम दुधासोबत गोळी घेणं चांगलं असतं असं म्हणतात. मात्र प्रत्येक गोळी आपल्या शरीरात वेगळ्या प्रकारे काम करते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या आपण कशासोबत घेतल्या पाहिजे हे एकदा नक्की विचारा.
‘या’ सोबत पेरासिटामोल गोळी घेऊ नका
काही गोळ्या या रिकाम्यापोटी घ्यायच्या नसतात. तर काही गोळ्यासोबत दूध घ्यायचं असतं कारण त्या शरीराला गरम पडतात. पण तुम्हाला माहिती जर पेरासिटामोल अकोल्होलसोबत घेतल्यास यामुळे शरीराचं नुकसान होतं. तज्ज्ञांच्या नुसार पेरासिटामोल चुकूनही अकोल्होलसोबत घेऊ नयेत.
का घेऊ नये अकोल्होलसोबत पेरासिटामोल
कारण अकोल्होलमध्ये इथेनॉल असतं. आणि जर पेरासिटामोल आणि इथेनॉल एकत्र आलं तर तुम्हाला उल्टी, डोकेदुखी होऊ शकते अगदी तुम्ही बेशुद्ध पडू शकतात. अनेक जण हैंगओवरमधून बाहेर पडण्यासाठी रातभर जास्त प्रमाणात अकोल्होलचं सेवन केलं असले आणि तुम्ही पेरासिटामोल घेतली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे लिव्हर मोठा परिणाम होऊ शकतो. मुळात कुठलीही गोळी ही अकोल्होलसोबत घेऊ नये.
किती प्रमाणात पेरासिटामोल घ्यावी
तर कुठलीही गोळीची सवय नसावी. कुठल्याही गोळीचं सेवन वारंवार करायला नको. वयस्कांसाठी पेरोसिटामोल एक डोज साधारण 1 ग्राम असावा. म्हणजे दिवसातून ते साधारण 4 ग्रामपर्यंत ही गोळी घेऊ शकतात. यापेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हरवर परिणाम होतो. जर तुम्ही दिवसाला 3 अकोल्होलचे ड्रिंक्स घेत असाल तर 2 ग्रामपेक्षा जास्त पेरासिटामोल घ्या. मात्र डॉक्टरांच्या सल्लाशिवाय हे बिलकुल करु नये. तर 2 वर्षांच्या खालील मुलांना पेरासिटामोल बिलकुल देऊ नयेत.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा