रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून होते सुटका, पाहा योग्य पद्धत

| Updated on: Sep 10, 2023 | 3:53 PM

रिकाम्या पोटी सकाळी लिंबू पाणी पिण्यासारख्या साध्या घरगुती उपचाराने आपल्या शरीराला आपण निरोगी ठेवू शकतो. पाहा लिंबू पाणी पिण्याचे कसे होतात फायदे

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून होते सुटका, पाहा योग्य पद्धत
lime water
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र सर्दी झाल्यास लिंबू पाणी पिणे टाळायला हवे. एरव्ही लिंबू पाणी प्यायल्याने आम्लपित्तापासून आराम मिळतो. तसेच पोटाशी संबंधित आजारात नाहीसे होतात. आपण लिंबू पाण्यात जर काळे मिठ टाकून हा रस पिला तर शरीराला फायदा होता. त्याने पीएच लेव्हल चांगली बॅलन्स होते. तसेच पोटाशिवाय हाडांसंबंधी आजारातही लाभ होतो. चला पाहूयात खाली पोटी लिंबू पाणी प्यायल्याने काय फायदे होतात.

त्वचा संबंधीचे विकार दूर होतात

लिंबू पाण्यात काळे मीठ ( सैंधव मीठ ) टाकून प्यायल्याने पॉटॅशियम, विटामिन्स सी आणि सोडीयम असे घटक मिळतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार होण्यास मदत मिळेत. त्यामुळे रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याच्या सवयीने त्वचा संबंधी आजारही बरे होण्यास मदत मिळते.

उच्च रक्तदाबातही फायदा

लिंबू पाणी रोज प्यायल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या गंभीर आजारात लिंबू पाण्याचा खूपच लाभ होत असतो. असे म्हटले जाते की माणसाचे पोट साफ झाले आणि वजन कमी झाले तर 90 टक्के आजार बरे होतात. लिंबू पाण्याने हे सर्व शक्य होत असल्याने अनेक आजारापासून दूर रहाता येते.

वजन कमी करण्यास होतो फायदा

दररोज नियमित काळे मीठ घालून लिंबू पाणी प्यायल्यास पोट चांगले साफ होण्यास मदत होते. यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील फायदा होतो. लिंबू पाण्याने सी विटामिन्स शरीराला मिळते. तसेच शरीराला डीटॉक्स करण्यासही हातभार लागतो. लिंबू पाण्यात एंटीऑक्सीडेंट गुण आढळत असल्याने शरीराला फायदा होतो.

पाचन तंत्र असे करा मजबूत

आज खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अपचनाचा त्रास होत असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण उपाशी पोटी रोज लिंबू पाणी काळे मीठ घालून प्यायल्यास खुप फायदा होतो. यामुळे गॅसेसची समस्या दूर होते. त्यामुळे जेवणाचे पचन सहज होते. त्यामुळे पचनयंत्रणा सुधारण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायद्याचे आहे.