मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये त्वचेसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या हंगामामध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे बरेच लोक थंड पदार्थांचे सेवन करतात. उष्णतेवर मात करण्यासाठी लोक अनेक थंड पेये देखील घेतात. यात थंडाईचा (Thandai) समावेश आहे. एक ग्लास थंडाईचे सेवन केल्याने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो, या पेयाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. विशेष म्हणजे ही थंडाई आपल्याला ऊर्जा (Energy) देण्यासही मदत होते. यामुळे या हंगामामध्ये थंडाईचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. थंडाईचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये निर्माण होतात. यामुळे थंडाईचे सेवन करायला हवेच. थंडाईमध्ये खसखस, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या, दूध आणि सुकामेवा टाकून तयार केली जाते. हे घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या टाळण्यास मदत करतात. बडीशेप सारखे घटक यामध्ये दाहक-विरोधी आणि थंड असतात. जठरासंबंधी समस्या दूर ठेवते. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी गुलाब पाकळ्या मदत करतात.
थंडाई बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते मेंदूसाठी खूप चांगले आहेत. त्यामध्ये प्रोटीन, ओमेगा 3 जीवनसत्त्वे आणि झिंक सारखे पोषक असतात. नियमितपणे थंडाई प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक लोकांचे ताण घेण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी एक ग्लास थंडाईचे सेवन करावे. यामुळे शरीर थंड राहते, शरीर आतून थंड राहते.