वंध्यत्व (Infertility) ही आजकालच्या महिलांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. बदलती जीवनशैली, सकस आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष, ताणतणाव आदी विविध कारणांमुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या सातत्याने वाढत आहे. इच्छा असूनही महिला वंध्यत्वामुळे गर्भधारणा करू शकत नाही. वंध्यत्वाच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जोडपी आयव्हीएफ (IVF) उपचार पद्धती घेण्यासाठी दवाखान्यात फेऱ्या मारत असतात. परंतु अनेक प्रकरणांमध्ये महिलांना खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा करू शकत नाहीत. या समस्येची लक्षणे योग्य वेळी लक्षात आल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. वंध्यत्वाची समस्या का निर्माण होत असते. त्याची लक्षणे (symptoms) काय आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. ‘Tv9 ’ने याविषयी सीके बिर्ला रुग्णालयातील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुणा कालरा यांच्याशी चर्चा केली आहे.
डॉ. अरुणा सांगतात, की जेव्हा तुम्ही गरोदर राहण्यासाठी खूप प्रयत्न करता परंतु ते शक्य होत नाही, तेव्हा वंध्यत्व येते. वंध्यत्वाचे मुख्य लक्षण म्हणजे गर्भधारणा होण्यास असमर्थता हे होय. जर तुमची मासिक पाळी खूप लांब किंवा कमी कालावधीसाठी येत असेल आणि या काळात तुम्हाला खूप वेदना होत असतील तर ते वंध्यत्वाचे लक्षण असू शकते. याशिवाय, वारंवार गर्भपात, कर्करोग उपचार किंवा एंडोमेट्रिओसिसचा इतिहास असल्यास वंध्यत्वाच्या तक्रारी असू शकतात. खालच्या ओटीपोटात खूप तीव्र वेदनादेखील त्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते. अशी कोणतीही लक्षणे शरीरात दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर लक्षणे ओळखून त्यावर उपचार करून हा आजार आटोक्यात ठेवता येतो.
खराब झालेल्या किंवा ब्लॉक केलेल्या फॅलोपियन ट्यूब शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. हे फॅलोपियन ट्यूबमधील नुकसान किंवा अडथळ्यामुळे होऊ शकते.
ही गर्भाशयाची समस्या असून, जेव्हा गर्भाशयाच्या अस्तराच्या टीशूंची म्हणजेच ऊतींची वाढ असामान्य होते. मग हे ऊतक गर्भाशयाच्या बाहेर पसरतात. त्यामुळे एंडोमेट्रिओसिसची समस्या निर्माण होत असते.
कधीकधी गर्भाशयाच्या मुखामुळे वंध्यत्वाची समस्या देखील निर्माण होत असते. या प्रकरणात फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकतात. ज्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. फाइब्रॉएड किंवा पॉलीप्स असलेल्या अनेक महिला गर्भवती होतात.
(टीप – वर सांगण्यात आलेली लक्षणं ही सर्वसामान्य आढळून येणारी निरीक्षणं असून कोणत्याही उपचार आणि वेदनांबाबत आपल्या डॉक्टरांना संपर्क करावा.)
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढला, भारताचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच… या गंभीर आजाराचे संकेत
औरंगाबादेत रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा तडफडून मृत्यू, गंगापूर तालुक्यात खळबळ