Ear Infection in Monsoon Reason: पावसाळ्यात (Monsoon season) अनेक आजारांचा धोका वाढतो. या काळात रोगप्रतिकारक शक्तीही (Immunity) कमी झालेली असल्याने अनेक रोगांचे जंतू आपल्या शरीरात सहज प्रवेश करून आपल्याला आजारी पाडू शकतात. सर्दी, खोकला, ताप हे आजार तर पावसाळ्यात सामान्यपणे होतच राहतात. पावसाच्या दिवसात योग्य काळजी न घेतल्यास फंगल इन्फेक्शनचा त्रास अनेक लोकांना होत दिसतो. त्याचा संसर्ग त्वचा, डोळो, कान , नाक यांना होऊन अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्यात बऱ्याच व्यक्तींना कानातील इन्फेक्शनचा (Ear Infection) त्रास होतो. पावसाच्या पाण्यामुळे तसेच हवेतील आर्द्रतेमुळे कान दुखणे, सुन्न होणे, सतत खाज सुटणे किंवा कानासंबंधी अन्य त्रास होऊ शकतात. तुम्हालाही कानासंबंधी ही लक्षणे जाणवत असतील, तुमच्या कानालाही इन्फेक्शन झाल्याची शक्यता आहे. अशावेळी त्वरित डॉक्टरांना दाखवून उपाय करावेत.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांत डोळे, कान, नाक आणि त्वचेसंबंधी समस्यांमध्ये वाढ दिसून येते. याचे मुख्य कारण असते, हवेतील आर्द्रता, जी फंगल इन्फेक्शन उत्पन्न करणाऱ्या जंतूचे प्रजनन स्थळ असू शकते. कानातील धूळ, घाण आणि इअरबड्सच्या खुणा, हेही इन्फ्केशनसाठी कारणीभूत ठरू शकतात.