थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात आल्याचा (Ginger) उपयोग होतो. अनेक जण चहा तसेच भाजांचा अस्वाद वाढवण्यासाठी भाजामध्ये अदरक टाकतात. तर काही जण आलं वाळवून त्याच्या पावडरचा वापर हा लाडू बनवण्यासाठी करतात. याचबरोबर सर्दी, खोकदा (Seasonal Health Problems) या सारख्या समस्यांवर देखील घरगुती उपाय म्हणून विविध पदार्थांसोबत आलं दिली जाती. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदिक औषधींमध्ये देखील अदरकीला महत्त्वाचे स्थान आहे. याची दखल आता आयुष मंत्रालयाकडून (Ayush Ministry Of India) देखील घेण्यात आली असून, कफ, सर्दी यासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून आल्या उपयोग कसा करावा हे सांगण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या सोशल मीडिया पेजवरून आलेपाक म्हणजेच अदरकीची बर्फी तयार करून खान्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच आयुष मंत्रालयाकडून अदरक पाकाची रेसीपी देखील शेअर करण्यात आली आहे.
आयुष मंत्रालयाच्या सेशल मिडीया पेजवरून आले पाक कसा बनवतात? त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात याची यादी देखील शेअर करण्यात आली आहे. तसेच काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अदरकची बर्फी बनवण्यासाठी गुळ, अदरक, सुंठ पावडर, तूप, इलायची, तेजपत्ता, गावरान तूप, काळे मिरे, धने पावडर, जीरा, आणि वायविडंग इत्यादी पदार्थांची आवशकता असते. या सर्व पदार्थांचे मिश्रण बनवून त्याला गुळाच्या पाकात भिजवून अदरक बर्फी आपण तयार करू शकतो.
आयुष मंत्रालयाने केवळ अदरक बर्फीसाठी काय काय लागते? याची यादीच दिली नाही तर त्यासोबत अदरक बर्फी खाण्याचे काय फायदे आहेत ते पन सांगितले आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अदरक बर्फी नियमित खाल्ल्याने तुमची पचनशक्ती वाढते, सर्दी, खोकला या सारख्या व्हायरल आजारापासून बचाव होतो, त्याचबरोबर तुमची भूख देखील वाढते. अनेक जण या अदरक बर्फीचे नित्यनेमाने सेवन करतात. दरम्यान अदरक ही उष्ण असल्यामुळे अदरकीच्या बर्फीचे सेवन कधी करावे कधी टाळावे याबाबतची देखील माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अदरक ही उष्ण असल्यामुळे शक्यतो उपाशी पोटी अदरक बर्फी खाऊ नये असा सल्ला मंत्रालयाच्या वतीने देण्यात आला आहे.